Home / Authors / Pratibha Ranade | प्रतिभा रानडे
Pratibha Ranade | प्रतिभा रानडे
Pratibha Ranade | प्रतिभा रानडे

जन्मतारीख: २० ऑगस्ट १९३७
शिक्षण: बी.ए.इकॉनॉमिक्स, बी.ए.पॉलिटिक्स, जर्नालिझम डिप्लोमा

*** राजहंस प्रकाशित साहित्य:
१. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
२. अफगाण डायरी -काल आणि आज
३. झांशीची राणी लक्ष्मीबाई
४. फाळणी ते फाळणी
५. पाकिस्तान अस्मितेच्या शोधात

*** राजहंस प्रकाशित साहित्य पुरस्कार:
महाराष्ट्र राज्य पुरस्कार - ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, अफगाण डायरी,
मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद -ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी,
आपटे वाचन मंदिर , इचलकरंजी - झाशीची राणी लक्ष्मीबाई,
सु.ल.गद्रे मातोश्री साहित्य पुरस्कार, मुंबई - एकूण साहित्यिक योगदान

प्रतिभा रानडे यांची आजपर्यंत विविध विषयांवरची आणि भिन्नभिन्न साहित्यप्रकारांत जोडणारी एकूण २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘

* बदनसीब’ (नंतरची आवृत्ती - अखेरचा ‘बादशहा’ - कादंबरी),
* काबूल-कंदाहारकडील कथा’, ‘
* बुरख्याआडच्या स्त्रिया’,
* ‘यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी - एक आकलन’,
* ‘एैसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’,
* ‘स्मरणवेळा’ - लेखसंग्रह,
* ‘अबोलीची भाषा’ - लेखसंग्रह,
* ‘मरुगान’ - कथासंग्रह,
* ‘फाळणी ते फाळणी’,
* ‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’,
* ‘पाकिस्तान डायरी’ - लेखसंग्रह,
* ‘ज्ञानकोशकार गणेश’, ‘रंगो भिडे’ - चरित्र, ‘
* अनुबंधन धर्मसंस्कृतीचे : आर्थिक सत्ता - राजसत्तांची झळ’,
* ‘अमीर खुस्रो - एक मस्त कलंदर’ चरित्र ही काही प्रमुख पुस्तके.

** ‘अफगाण डायरी’, ‘बुरख्याआडच्या स्त्रिया’, ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ यांची इंग्रजी भाषांतरे प्रसिद्ध.

अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, इचलकरंजी आपटे वाचन मंदिर, महाराष्ट्र सेवासंघ मुलुंड, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, यू. आर. एल. फौंडेशन, साहित्य जीवनगौरव इत्यादी पुरस्कार फोर्ड फाउंडेशनची संशोधन वृत्ती, एशियाटिक लायब्ररी (मुंबई) संशोधनवृत्ती.

** बृहन्महाराष्ट्र महानगर साहित्य संमेलन (मुंबई),
** मराठी वाङ्मय परिषद (बडोदा),
** मराठी महिला साहित्य संमेलन (मुंबई),
** साहित्यप्रेमी भगिनी मंडळ (पुणे) या संमेलनाच्या अध्यक्षपदी आमंत्रित.
** विविध विषयांवर लंडन, ब्रॅडफोर्ड सह विविध भारतीय विद्यापीठांत चर्चासत्रांच्या अध्यक्षपदी आमंत्रित, ** जेरुसलेम येथील मायबोली मासिकातर्फे गौरव.
‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ या चरित्राची इंग्रजीबरोबरच िंहदी, उडिया, कानडी भाषांतरे प्रकाशित.

Pratibha Ranade | प्रतिभा रानडे ह्यांची पुस्तके