Home / Authors / Manoj Borgaonkar | मनोज बोरगावकर
Manoj Borgaonkar | मनोज बोरगावकर

मनोज बोरगावकर (जन्म : अर्जापूर-बिलोली (नांदेड जिल्हा) हे एक मराठी साहित्यिक आहेत.

* त्यांनी नांदेडच्या 'नेताजी सुभाषचंद्र बोस' काॅलजातून राज्यशास्त्र हा विषय घेऊन .एम.ए.ची पदवी संपादन केली आहे.

* ते नांदेड शहरातील वजिराबाद येथील खुर्शीदबानू आर. मेवावाला आर्ट्‌स ॲन्ड काॅमर्स महिला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

*** मनोज बोरगावकरांनी लिहिलेली पुस्तके
* अकथ कहाणी सद्गुणांची ललित)
* कोरा कागद निळी शाई (कवितासंग्रह, पहिली आवृत्ती : सप्टेंबर.२००६, दुसरी आवृत्ती : एप्रिल २०१२)
* नदीष्ट (कादंबरी)
* पाश्चिमात्य विचारप्रवाह (काॅलेजच्या अभ्यासक्रमासाठीचे राज्यशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
* लोकप्रशासन (काॅलेजच्या अभ्यासक्रमासाठीचे राज्यशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
* स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह (काॅलेजच्या अभ्यासक्रमासाठीचे राज्यशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)

*** दैनिकांच्या पुरवण्यामधून केलेले लेखन :-
* १)दैनिक सकाळ माध्यम - YIN (Young inspiraters network) या विषयावरील लेख
* २) दैनिक लोकमतच्या पुरवणीतील लेखन : १) आयुष्य उलगडताना.

*** इतर लेखन :-
* १) "गाय दि मोपांसा" या फ्रेंच कथाकारावर लेख.
* २) अनेक पुस्तकांवर समीक्षा लेखन

*** मनोज बोरगवकरांचे पदवी अभ्यासक्रमातील योगदान :
* १) त्यांची 'आत्महत्येपूर्वीचे स्वगत' ही कविता नांदेडच्या विद्यापीठांतर्गत बी.ए. (प्रथम वर्षा)च्या मराठी पुस्तकात समाविष्ट झाली आहे.

* २) एम. ए. प्रथम वर्षासाठी वर्ष २००९-२०१० च्या अभ्यासक्रमात त्यांची 'कोरा कागद निळी शाई ' ही कविता होती.

* ३) राज्यशास्त्र या विषयासाठी एम्. ए.च्या अभ्यासक्रमात त्यांचे 'आंतरराष्ट्रीय संबध' या विषयावरचे लेखन समाविष्ट झाले आहे.

*** ४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या राज्यशास्त्र या विषयासाठी
* १) स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह,
* २) पाश्चिमात्य विचारप्रवाह आणि
* ३) लोकप्रशासन, या ३ पुस्तकांचे लेखन.

*** मनोज बोरगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
* अच्युत बन पुरस्कार, नांदेड
* इचलकरंजीच्या आपटे ग्रंथालयाकडून पुरस्कार
* कविवर्य टिळक पुरस्कार
* कालिदास पुरस्कार
* राय हरिश्चंद्र साहनी 'दुःखी'पुरस्कार
* YIN (Young inspiraters network) या चळवळीसाठी आयकॅन म्हणून निवड.
* महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम प्रौढ कादंबरी २०२० पुरस्कार ('नदीष्ट'साठी.)

*** विशेष सन्मान
मुंबईतील भारतीय विद्याभवनाच्या 'तेरह शिखर, तेरह आवृत्तियाँ' या प्रकल्पासाठी १३ भाषांतील, १३ ज्ञानपीठ विजेत्या कवींच्या,'संभवनाएँ' निवडल्या गेल्या. त्यांत कुसुमाग्रजांच्या कवितांची शिखर म्हणून, आणि मनोज बोरगावकरांच्या कवितांची 'संभावनाएँ म्हणून निवड.

Manoj Borgaonkar | मनोज बोरगावकर ह्यांची पुस्तके