Home / Authors / Mahesh Elkunchawar | महेश एलकुंचवार
Mahesh Elkunchawar | महेश एलकुंचवार
Mahesh Elkunchawar | महेश एलकुंचवार

जन्मतारीख: 9 ऑक्टोबर 1939

शिक्षण: M.A. English, Nagpur University

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. सप्तक
२. संवादाचा सुवावो : प्रा. राम शेवाळकरांशी रंगलेल्या गप्पा

भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. ज्यात वास्तववादी , प्रतीकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत त्यांनी रचना केलेल्या आहेत. सर्जनशीलता ही त्यांच्याकडे उपजत आहे.जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जन्म ते मृत्यू यासारख्या विविध थीम त्यांनी मांडल्या आहेत. तीन ते चार दशकांहून अधिक काळ आधुनिक भारतीय रंगमंचावर त्यांचा प्रभाव आहे.

* १९६७ मध्ये सत्यकथा या प्रख्यात साहित्यिक मासिकात 'सुलतान' या त्यांच्या एकांकिकेच्या प्रकाशनानंतर महेश एलकुंचवार नाट्यसृष्टीत प्रकाशझोतात आले . प्रसिद्ध दिग्दर्शक विजया मेहता यांनी एलकुंचवार यांची नाट्यकृती रंगमंचावर आणली.

* १९६९ आणि १९७० मध्ये होळी आणि सुलतान यांच्यासह रंगायनसाठी त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले.महेश एलकुंचवार यांच्या नाटकांवर आधारित होली ,रक्तपुष्प, पार्टी , विरासत अशा अनेक व्यावसायिक चित्रपटांनंतर यश मिळाले. महेश एलकुंचवार यांच्या नाटकांचे अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये भाषांतर केले गेले. (इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन इत्यादी)

* १९८४ मध्ये त्यांच्या होळी या नाटकावर केतन मेहता यांनी होली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी महेश एलकुंचवार यांनी पटकथा लिहिली होती. त्याच वर्षी गोविंद निहलानी यांनी महेश एलकुंचवार यांच्या पार्टी नावाच्या नाटकावर आधारित ‘पार्टी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

* सोनाटा या एलकुंचवार यांच्या अभिजात नाटकावर आधारित चित्रपटात अपर्णा सेन, शबाना आझमी आणि ललित दुबे यांनी भूमिका साकारल्या आहेत.महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी भारतीय रंगभूमीवरील महान दस्तऐवज आहे.

Mahesh Elkunchawar | महेश एलकुंचवार ह्यांची पुस्तके