Home / Authors / Madhav Vaze | माधव वझे
Madhav Vaze | माधव वझे
Madhav Vaze | माधव वझे

माधव वझे (जन्म : २१ ऑक्टोबर १९३९; )

हे आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट आहेत.

माधव वझे हे पुण्याच्या वाडिया काॅलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.

परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.

*** माधव वझे यांची भूमिका असलेले चित्रपट
* डिअर जिंदगी (हिंदी चित्रपट, २०१६)
* थ्री इडियट्स (हिंदी चित्रपट, २००९)
* श्यामची आई (बालनट, १९५३)

*** माधव वझे यांची पुस्तके
* प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन - माधव वझे)
* रंगमुद्रा (अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे)
* श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी (आठवणी)
* नंदनवन (मुलांसाठी)
* समांतर रंगभूमी

Madhav Vaze | माधव वझे ह्यांची पुस्तके