Home / Authors / Bhimrao Gasti | डॉ. भीमराव गस्ती
Bhimrao Gasti | डॉ. भीमराव गस्ती
Bhimrao Gasti | डॉ. भीमराव गस्ती

डॉ. भीमराव गस्ती (जन्म : यमनापूर-बेळगांव, इ.स. १९५०; - कोल्हापूर, ८ ऑगस्ट, इ.स. २०१७) हे देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक होते.

* बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या 'बेरड' या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.

*** शिक्षण
बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी यमनापूर गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील `डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली.

*** डॉ. भीमराव गस्ती यांनी लिहिलेली पुस्तके
आक्रोश
बेरड (आत्मचरित्र) : या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारासह सात अन्य पुरस्कार मिळाले.
सांजवारा

*** डॉ. भीमराव गस्ती यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
* डॉ. अरुण लिमये पुरस्कार, जुलै १९८९.
* कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च १९९०
* गोदावरी गौरव पुरस्कार, २००४
* पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर १९८९.
* बापूसाहेब विंधे वाङ्मय पुरस्कार (रत्‍नागिरी) मे १९८९.
* महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर १९९०.
* मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी १९९१.
* मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी १९९०.
* रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून १९८९.
* समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च १९९१.
* ९व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

Bhimrao Gasti | डॉ. भीमराव गस्ती ह्यांची पुस्तके