Home / Authors / Arvind V. Gokhale | अरविंद व्यं. गोखले
Arvind V. Gokhale | अरविंद व्यं. गोखले
Arvind V. Gokhale | अरविंद व्यं. गोखले

अरविंद व्यं. गोखले हे गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. केसरी, लोकमत आणि लोकसत्ता या दैनिकांचे संपादकपद त्यांनी भूषविले आहे. उपसंपादक ते संपादक असा त्यांचा केसरीतील प्रवास. वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी लंडनच्या `कॉमनवेल्थ प्रेस युनियनची फेलोशिप' मिळवून
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पुरा करणारे गोखले पुढे वॉिंशग्टनच्या ‘हेन्री एल स्टिम्सन सेंटरच्या फेलोशिप'चेही मानकरी बनले. त्यांनी वॉिंशग्टनमध्ये राहून `भारत-पाकिस्तान संबंध आणि काश्मीरचा प्रश्न' यावर त्या संस्थेत एक प्रबंधही सादर केला. त्यावर तिथे चर्चाही घडवून आणण्यात आली होती.

श्री. गोखले हे पाकिस्तान या विषयातले तज्ज्ञ मानले जातात. पाकिस्तान या विषयावर त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. श्री. गोखले हे लोकमान्य टिळकांचे अभ्यासक या नात्याने महाराष्ट्रास परिचित आहेत. ते अनेक पारितोषिकांचे मानकरी आहेत.

प्रकाशित साहित्य
१. अक्षरांजली
२. पाकिस्ताननामा
३. अमेरिकेत शिकायचंय?
४. आय. सी. ८१४ (कादंबरी)
५. संपादन
६. कारगिल ते कंदाहार
७. परदेशात शिकायचंय!
८. मंडालेचा राजबंदी
९. पाकिस्तानात साठ वर्षे (अनुवादित)
१०. अल् काईदा ते तालिबान (अनुवादित)
११. असाही पाकिस्तान
१२. आसपास
१३. संघर्ष बलुचिस्तानचा
१४. कलम ३७०±३५ अ
१५. ड्रॅगनचे करोनास्त्र
१६. `मंडालेचा राजबंदी' या पुस्तकाचा श्री. अनिल गोखलेकृत अनुवाद The Prisoner of Mandalay
१७. टिळकपर्व
१८. वज्रपुरुष
१९. अष्टावधानी लोकमान्य
२०. खलिस्तानचे कारस्थान

झी मराठीच्या `लोकमान्य' या अत्यंत लोकप्रिय मालिकेचे संशोधनप्रमुख या नात्याने काम.

Arvind V. Gokhale | अरविंद व्यं. गोखले ह्यांची पुस्तके