Home / Authors / Anant Abhang | अनंत अभंग
Anant Abhang | अनंत अभंग
Anant Abhang | अनंत अभंग

*** शैक्षणिक यश व विद्यार्थीदशेतील उपक्रम :

* पाचवीपासून पदवीपर्यंत सतत १३ वर्षे मिडल-स्कूल स्कॉलरशिप, हायस्कूल स्कॉलरशिप, इंडिया फाउंडेशन स्कॉलरशिप, नॅशनल स्कॉलरशिप्सवर शिक्षण.

* १९६९ साली एस.एस.सी.बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये क्रमांक

* १९७५ साली सी.ओ.ई.पी., पुणे विद्यापीठ येथून बी. ई. (मेकेनिकल) विशेष गुणवत्ते सहित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

* सिम्बॉयसिस, पुणे विद्यापीठयेथून डी.बी.एम. व एम. एम.एस. (Master of Management Science) विशेष गुणवत्तेसहित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

* ज्ञान प्रबोधिनी, पुणे या संस्थेतर्फे निवडक बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणा-या 'प्रबोधशाला' या उपक्रमामध्ये निवड व तेथे १० वर्षे प्रशिक्षण.

* विद्यार्थीदशेत क्रीडा, युवक संघटन, आंध्र वादळ मदतकार्य, देश प्रश्नांचा अभ्यास अशा विविध उपक्रमात सहभाग व व्यवस्थापन.

*** व्यवसाय

* इंजिनियरिंगच्या पदवीनंतर ज्ञान-प्रबोधिनीच्या उद्योग, शिक्षण व ग्रामीण विकसन या प्रभागात १२ वर्षे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम.

* गेली २० वर्षे पुण्याच्या परिसरात स्वत:चा बांधकामाचा व्यवसाय. पुण्यातील सर्वोत्कृष्ट Residential Building (1997) व Institutional Building (2009) असे दोनदा AESA - पुणे यांचे पुरस्कार.

*** विविध उपक्रम

* विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास' या विषयावर महाराष्ट्रात सर्वत्र व्याखाने व गटचर्चा.

* परीक्षेत व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक शालेय व महाविद्यालयीन तसेच इंजिनियरिंग, मेडिकल, लों, स्पर्धा परीक्षा अशा अनेक क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना आणि प्रौढांनासुध्दा समुपदेशन (Achievement Counselling)

* बजाज ऑटो, हिंदुस्थान लिव्हर अशा विविध उद्योगातील आणि शासनातील कर्मचा-यांना आणि अधिका-यांना मॅनेजमेंट ट्रेनिंग.

* ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी 'उद्योजकता विकासा' च्या अभ्यासक्रमाची आखणी आणि प्रशिक्षण. त्यातून अनेक छोट्या उद्योगांना चालना.

*** सामाजिक विषयांचा अभ्यास

* 'दारिद्र्यनिर्मूलन' या विषयाचा धर्म, संस्कृती, राजकारण, अर्थशास्त्र, शिक्षण, विकासनीती, प्रसारमाध्यमे, संपर्कमाध्यमे, अशा विविध अंगांनी अभ्यास.

* महिला विकासाच्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन स्त्री प्रश्नांचा अभ्यास.

* 'चिकित्सा, पुणे' या अभ्यासगटाचे (Thinj Tank) कार्यवाह म्हणून काम.

*** 'मित्र' (Mission for Transformation of Rurban Area)

* 'मित्र' या संस्थेचे संस्थापक कार्यवाह.

* 'मित्र' तर्फे मराठवाड्यात शेतीपूरक उद्योग, शेतमालप्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान प्रशिक्षण अशा माध्यमातून 'हरित उद्योग क्रांती; घडविण्यासाठी विविध उपक्रमांना चालना.

Anant Abhang | अनंत अभंग ह्यांची पुस्तके