Home / Rajhans / श्री.ग. माजगावकर
श्री.ग. माजगावकर photo

श्री.ग. माजगावकर

श्रीकांत माजगावकर (श्रीभाऊ वा श्री.ग.मा) हे पत्रकार, लेखक, प्रकाशक आणि ‘माणूस’ या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक म्हणून काम पाहत होते. ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर या नावाने ते प्रसिद्ध होते. श्री. ग. माजगावकर यांनी आपल्या लेखणीद्वारे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा ‘माणूस’कार पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार २०१९ ते २०२९ असा ११ वर्षे दिला जाईल आणि श्रीगमांच्या जन्मशताब्दी वर्षात त्याची सांगता होईल. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या हिमतीवर अशाप्रकारे एक मासिक आणि प्रकाशनसंस्था चालविणे ही त्या काळात अतिशय धाडसाची आणि जिद्दीची बाब होती. साहित्यक्षेत्रात आपला ठसा उममटविणारे श्री.ग.मा हे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.

पुस्तकलेखन
  • निर्माणपर्व
  • बलसागर
  • श्रीग्रामायन
  • पुरस्कार
  • शेतकीमंत्री शरद पवारांच्या हस्ते मिळालेला ‘अ‍ॅग्रोफॉरेस्ट्री’ पुरस्कार. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मिळालेला उत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार.