अशी ही इंग्रजी (भाग ४था) | Ashi hi Ingraji (Bhag-4)

अशी ही इंग्रजी (भाग ४था) | Ashi hi Ingraji (Bhag-4)

'ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही त्यांना इंग्रजीत बोलणे अवघड का वाटते? कारण त्यांना मराठीतून विचार करण्याची सवय तात्पुरती बाजूला ठेवून त्यावेळी इंग्रजी भाषेच्या माध्यमातून विचार करावा लागतो. असे दुस-या भाषेशी जुळवून घएणे सर्वांना जमतेच असे नाही. कोणत्याही प्रसंगाबद्दलचा विचार `उत्तम इंग्रजी’ भाषेत मनात आला; तर त्याचे प्रकटीकरणही सुंदरच होणार. चांगले इंग्रजी येण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? पहिली गोष्ट म्हणजे त्या भाषेची आवड हवी. ती समजण्याची विशेष पात्रता – a flair for the language असेल तर काय दुधात साखरच! दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी व्याकरणातील प्रमुख नियमांचे, इंग्रजी भाषेच्या अंगाचे, त्या भाषेतील बारकाव्यांचे ज्ञान असायलाच हवे. तिसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध असायला हवा. तो नसेल तर वाढवायला या क्षणापासून सुरुवात करा. एका अमेरिकन शिक्षणतज्ज्ञाने म्हटलेच आहे – `Thought is impossoble without words.’’ तुमचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यास मदत करणे हेच या पुस्तकाचे प्रयोजन. '

'Pages: 208 Weight:0 ISBN:978-81-7434-233-1 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जुलै 2005 पहिली आवृत्ती:जून 2002 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save
₹ 10 (10%)
Out of Stock