Home / Authors / Yogiraj Bagul | योगिराज बागूल
Yogiraj Bagul | योगिराज बागूल

योगीराज बागूल हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक आहेत.

* योगीराज बागूल यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी खंडाळा (या.वैजापूर, जि.औरंगाबाद) येथील जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील नागसेन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले.

* साहित्याला आकार देण्यासाठी प्रा.प्र.ई. सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनभिज्ञ पैलू आणि त्यांचे अजूनही माहित नसलेले कार्य शोधणे हा बागूल यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही वाङमय प्रकाराला (आत्मचरित्र, चरित्र, कादंबरी, कविता आणि संपादन) स्पर्श केला आहे.

* बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

* राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम) येथे उप व्यवस्थापक पदावर नोकरी करीत आहेत.

*** भूषवित असलेली पदे
* अजीव सभासद - मुंबई मराठी साहित्य परिषद
* अजीव सभासद - कोकण मराठी साहित्य परिषद,
* सदस्य - डाँ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन.
* सदस्य - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अंतर्गत सजावट समिती, ऐरोली, नवी मुंबई महानगरपालिका.
* सदस्य - स्मृतिशेष घनःशाम तळवटकर जन्मशताब्दी महोत्सव समिती, मुंबई.
* सदस्य - ग्रंथ निवड आणि खरेदी समिती; डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), स्वायत्त संस्था, महाराष्ट्र शासन, पूणे.
* सल्लागार - प्र.ई. सोनकांबळे प्रतिष्ठान, औरंगाबाद.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (बार्टी), पूढे या संस्थेच्या संशोधन परिषदेवर सदस्य म्हणून निवड.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कल्याण (पू) अंतर्गत सजावट अभ्यासक समितीत सदस्य

*** साहित्यनिर्मिती

* प्रिय रामू, माता रमाबाई आंबेडकर यांचे चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)[२]
* सोयरिक (काव्यसंग्रह-मृदगंधा प्रकाशन,भोसरी,पुणे)
* ही वाट सुनसान कशी? काव्यसंग्रह (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
* पाचट आत्मचरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग-१ वैचारिक (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
* तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा, चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
* आठवणीतले बाबासाहेब,व्यक्तिचित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
* डॉ. बी. आर. आंबेडकर रेमनिसन्सिज बाय हिज क्लोज असोसिएट्स (इंग्रजी-अनोखी प्रकाशन)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी सहकारी भाग-2 वैचारिक,(पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
'* यादें बाबासाहेब की' (हिंदी भाषेत) सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली.
* दळण दळीत्ये' (आईच्या जात्यावरच्या ओव्यांचे संकलन-पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
* 'दगडी वाडा' ग्रामीण मराठी कादंबरी (पेरणी प्रकाशन -नवी मुंबई)
'* धूमसता धुमकेतू' महाकवी वामनदादा कर्डक यांचे जीवनचरित्र (पेरणी प्रकाशन -नवी मुंबई)


*** समाजभान
* महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने

* सह्याद्रि दूरदर्शन, एबीपी आणि साम टव्हिसह अनेक चैनल्सवर वेगवेगळ्या विषयांवर मुलाखती.

*** स्फुट लिखाण
* आरसपाणी (जेष्ठ लेखक वामन होवाळ यांचा अमृतमहोत्सवी अंक)- लेख
* आठवींतले डाँ.गंगाधर पानतावणे-संपादक वैभव काळखैर (परिवर्तण प्रकाशन) - लेख
* महामानव - संपादन अँड. विश्वास कश्यप - लेख
* आंबेडकरी चळवळीचा शिलेदार अमृतमहोत्सवी गौरवांक) मलपृष्ठी मचकूर श्री. देवचंद अंबादे

Yogiraj Bagul | योगिराज बागूल ह्यांची पुस्तके