Home / Authors / Vishram Gupte
Vishram Gupte

विश्राम गुप्ते हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. ते मुळचे नागपूरचे असून गेल्या २० वर्षांपासून ते गोवा येथे स्थायिक झाले आहेत. म्हापसा येथील बांदेकर कॉलेजमधील शिक्षकाची नोकरी सोडून ते चार वर्षांसाठी सौदी अरेबियात गेले होते. तेथील वास्तव्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरातील स्त्री-पुरुष, त्यांचे जगणे, व्यथा अशा अनेक बाबी त्यांच्या लिखाणात पहायला मिळतात.

* विश्राम गुप्ते यांची बाराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली असून, मराठी वाचकांवर चेटूक करणारे म्हणून ते ओळखले जातात.

*** विश्राम गुप्ते यांची काही 'खास' मते
* संस्कृती वैविध्यतेमुळे मराठीत शहरी, ग्रामीण, आणि दलित ह्या तीन निरनिराळ्या संवेदनाशीलता जन्माला आल्या आहेत. (सकल संत गाथा यांना जोडू शकत नाहीत.)

* मराठीतल्या अभिजात कवी, नाटकककार, कथालेखक आणि कादंबरीकारांनी जर इंग्रजी साहित्य वाचले नसते, तर ते जन्मभर 'रामकृष्णहरी' करत बसले असते.

* मराठी साहित्यासारखी भक्तिपरंपरा इंग्रजी साहित्यातही आहे, पण ती सर्वव्यापी नाही. पाश्चात्त्य साहित्यात धार्मिक, धर्मनिरपेक्ष आणि पाखंडी परंपरा असते, तर मराठीत फक्त भक्तिपरंपरा.

* पाश्चात्त्य साहित्य व्यवहार वैश्विक आहे, तर मराठी साहित्य व्यवहार कौटुंबिक आहे.

* पाश्चात्त्य साहित्य जगण्याचे नवे प्रश्न विचारते, तर मराठी जगण्याची जुनीच उत्तरे देते.

* पाश्चात्त्य समीक्षा विश्लेषक तर, मराठी वर्णनात्मक.

* एखादा लेखक महत्त्वाचा का ते पाश्चात्त्यांना सांगावे लागते, मराठीत हा लेखक मोठा आहे असे म्हटले की भागते.

* मराठीत उसनवारीचे सौंदर्यशास्त्र रचले गेले. पाश्चात्त्य साहित्यात उसनवारीची चर्चा होत नाही. वगैरे.

*** विश्राम गुप्ते यांनी लिहिलेली पुस्तके
* आपला थोर मध्यमवर्ग (अनुवादित, मूळ इंग्रजी - The great Indian middle class, लेखक पवन वर्मा)
* अल् तमीर (ऐतिहासिक कादंबरी)
* ईश्वर डॉट कॉम (विनोदी कादंबरी). इंग्रजीतही अनुवादित झालेली.
* ऊन (कादंबरी)
* चेटूक (कादंबरी)
* मवं जग नवं साहित्य (समीक्षाग्रंथ)
* नवं जग नवी कविता (समीक्षाग्रंथ)
* नारी डॉट कॉम (कादंबरी)
* परीकथा आणि वास्तव (ललित)
* People (ईंंग्रजी, अनुवादित, मूळ पुस्तक 'माणसं' लेखक - अनिल अवचट)
* मेलेल्यांची गढी (अनुवादित, मूळ लेखक - फ्योदोर दस्तयेवस्की)
* लेखकाची गोष्ट : अ सर्व्हायकल गाईड फाॅर मराठी रायटर्स (आत्मकथन)

*** पुरस्कार
* पवन वर्मा यांच्या “The great Indian middle class’ या पुस्तकाच्या 'आपला थोर मध्यमवर्ग' या अनुवादासाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Vishram Gupte ह्यांची पुस्तके