विलास फडके | Vilas Phadake
मुंबई नागरिक समिती' आणि 'कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पुरस्कार.
'वेस्टर्न झोन इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन'चे मुखपत्र 'आंदोलन' पेण शाखेतून सुरू करण्यात पुढाकार घेतला, नंतर ते डिव्हिजनल व पुढे झोनल पातळीवर प्रसारित होऊ लागले.
'मोहिनी', 'नवल', 'मेनका', 'पाठलाग' मासिकांतून अनुवादित कादंबऱ्या मालिकास्वरूपात प्रकाशित झाल्या आहेत.
'मोहिनी', 'नवल', 'धनंजय', 'चंद्रकांत', 'खतरनाक' इ. दिवाळी अंकांमध्ये स्वतंत्र तसेच अनुवादित कथा व कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.
स्वतंत्र, अनुवादित, रूपांतरीत मिळून एकूण ४५ पुस्तके प्रकाशित.