Home / Authors / Vandana Atre | वंदना अत्रे
Vandana Atre | वंदना अत्रे

वंदना अत्रे
आजवर सहा अनुवादित पुस्तके आणि तीन स्वतंत्र पुस्तके प्रकाशित.

* कवी कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘नक्षत्रांचे आश्वासन' या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश असलेल्या पुस्तकाची आखणी आणि संपादन.

* भारतातील विविध राज्यांत, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या स्त्रियांच्या कामाचा आणि त्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रातील स्त्रियांच्या नेतृत्वाचा आढावा घेणार्‍या ‘पाऊल पुढे पडताना' ह्या, संशोधन आणि प्रत्यक्ष भेटींवर आधारित,

* पुस्तकास २०११ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कमल आणि के. पी. भागवत पुरस्कार (वैचारिक, स्त्री-जीवनविषयक प्रकारातील)

* ‘विजयाचे मानसशास्त्र' ह्या अनुवादित पुस्तकास २०१० साली नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्राप्त.

* तीन दशके ‘गावकरी' ह्या वृत्तपत्रात मुख्य सहसंपादक म्हणून काम सध्या मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत.

* विविध प्रकाशनगृहे आणि सामाजिक संस्था आणि उद्योगक्षेत्र ह्यांच्या प्रकाशनांसाठी संपादक आणि अनुवादक म्हणून काम करीत आहे.

* सध्या कॅन्सरग्रस्तांसाठी ‘आरंभ' ह्या पुढाकारातर्पेâ समुपदेशन आणि जीवनशैली शिक्षण देण्याचे काम प्राधान्याने करीत आहे.

Vandana Atre | वंदना अत्रे ह्यांची पुस्तके