Home / Authors / Vaishali Karmarkar | वैशाली करमरकर
Vaishali Karmarkar | वैशाली करमरकर
Vaishali Karmarkar | वैशाली करमरकर

जन्मतारीख: १४ जुलै १९५७

इंग्लिश लिटरेचर आणि जर्मन स्टडीजमध्ये बॅचलर्स व मास्टर्स.
• अमेरिकन आणि जर्मन संस्थांकडून आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ म्हणून काम करण्यासाठी आवश्यक ती पात्रता-प्रमाणपत्रे प्राप्त.
• जर्मनीच्या फॉरेन ऑफिससाठी अनेक पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांमध्ये आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ म्हणून काम.

• गेल्या पंचवीस वर्षांपासून आय टी, टेलिकम्युनिकेशन, बँकिंग अँड फायनान्स, ऑटोमोबाईल, केमिकल अँड फार्मा, मॅनेजमेंट कन्सल्टिंग अशा विविध सेगमेंट्समध्ये आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ म्हणून कार्याचा अनुभव.

• `अनुवादशास्त्र आणि आंतरसांस्कृतिकता यांच्यातील संबंध' या विषयासाठी जर्मनीतील `माईन्स विद्यापीठा'त १२ वर्षे निमंत्रित प्राध्यापक म्हणून काम.

• `संस्कृतिरंग', `कल्चर शॉक जर्मनी' आणि `वावटळ पेराल, तर वादळच उगवेल!' (जर्मन ते मराठी अनुवाद) अशी ३ मराठी पुस्तके प्रकाशित. प्रकाशन - राजहंस प्रकाशन.

• `डॉक्टर गेऑर्ग ब्यूलर - अ मोनोग्राफ' हे इंग्रजी पुस्तक. प्रकाशन - इंडस सोर्स बुक आणि द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई.

• जर्मन भाषेत सारसंदर्भ ग्रंथाचे सहलेखन. विषय - आंतरसांस्कृतिकता आणि कौशल्यविकास.

• मराठी, जर्मन आणि इंग्रजी या भाषांतून ललितेतर विपुल लिखाण आणि व्याख्याने. विषय - भूराजकारण, आंतरसांस्कृतिक समन्वय, भाषा - एक सॉफ्टपॉवरचे अस्त्र, ग्लोबलिस्ट आक्रमकतावाद, पाश्चात्त्य आणि पौर्वात्य मूल्यसंघर्षाचे उगमबिंदू इत्यादी.

• समाजमाध्यमातील सहभाग
Think bank - https://www.youtube.com/watch?v=iqTwahSpG6c
Swayam Talks - https://www.youtube.com/watch?v=A9Ol6BvU7WI

Vaishali Karmarkar | वैशाली करमरकर ह्यांची पुस्तके