Home / Authors / Sushil Gaikwad
Sushil Gaikwad

सुशील रावसाहेब गायकवाड

जन्म कोल्हापूरमध्ये, तर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी पदवी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून घेतली. त्यानंतर ते यू.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षा १९९८ साली देशभरात १८२ वी
रँक पटकावून पास झाले. तेथून मसुरी, बडोदा व भारतात विविध ठिकाणी प्रशिक्षण घेऊन ते इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये रुजू झाले. यू.पी.एस. सी.ला त्यांनी कृषी विषय न घेता मराठी साहित्य हा विषय घेतला.

* पुढे बेंगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे व सोलापूर येथे रेल्वेच्या विविध उच्च पदावर कार्य केले. दरम्यान रेल्वे विभागाने त्यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल चार वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून कार्य करताना त्यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या `अन्न व कृषी परिषदे'च्या हार्ड फायबर आंतरराष्ट्रीय गटावर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

* मराठी साहित्याचे विपुल वाचन व प्रेम. नियतकालिकांतून काही लेखही प्रकाशित. कामानिमित्त देश-विदेशात भरपूर प्रवास, ट्रेकिंग व छायाचित्रकारितेचा छंद. सध्या केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्र्याचे खासगी सचिव म्हणून दिल्ली येथे कार्यरत.

Sushil Gaikwad ह्यांची पुस्तके