Home / Authors / Suresh Sodal | सुरेश सोडळ
Suresh Sodal | सुरेश सोडळ

* शिवाजी विद्यापीठातून १९६९ साली विशेष प्राविण्यासह बी. ई. सिव्हील पदवीप्राप्त.

* रुरकी विद्यापीठ (उत्तर प्रदेश) येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण.

* महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून सचिव म्हणून मार्च २००६ मध्ये सेवानिवृत्ती.

* महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये साडेसात वर्षे सचिव व अडीच वर्षे अभियांत्रिकी सदस्य असे एकूण १० वर्षे शासन सेवानिवृत्तीनंतर काम केले. पाण्याच्या क्षेत्रात असे एकंदर ४६ वर्षे (१९६९ ते २०१६) सेवा.

* राज्यातील जलसंपत्तीचा समतोल व शाश्वत विकास होण्यासाठी तसेच पुढच्या पिढीचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी राज्याची जलनीति २००३, शेतक-यांच्या सिंचनासाठी स्वतंत्र कायदा २००५ व राज्यात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी योगदान.

* राज्यातील सिंचनाचा लेखा-जोखा राज्यातील सर्व पाणी वापरकर्त्यांना व पाण्याच्या क्षेत्रात काम करणा-या संघटनांना उपलब्ध होण्यासाठी वार्षिक सिंचनस्थिती अहवाल, प्रकल्पाचे मानांकन (बेंच मार्किंग) अहवाल व वाॅटर ऑडिट अहवाल बनवून राज्याच्या संकेतस्थळावर २००१ पासून ठेवण्याची संकल्पना सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.

*** पुरस्कार
* मला माझ्या जलक्षेत्रातील योगदानाबाबत आंतरराष्ट्रीय सिंचन परिषदेने (आय.सी.आय.डी.) २००४ साली मास्को येथे वाॅटर सेव्ह ॲवाॅर्ड' प्राप्त झाले. तसेच देशातील सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर यांनी मला शांती मोहन यादव ॲवाॅर्ड प्रदान केले.

*** शासन सेवत असताना शासनाने मला खालील देशांमध्ये अभ्यास दौ-यांसाठी व पाणी परिषदेसाठी पाठवले.
* युटा स्टेट युनिव्हर्सिटी (अमेरिका) - ३ महिने प्रशिक्षण (१९८३)
* इज्प्त, मोरोक्को व फ्रान्स - कॅनाॅल ऑटोमायझेशन (अभ्यास दौरा १९९२)
* मेक्सिकोमधील 'आंतरराष्ट्रीय पाणी-वापर संस्था' परिषद (१९९४)
* युके - नेदरलँड - जलविज्ञान प्रकल्प अभ्यास दौरा (१९९७)
* सरदार सरोवर प्रकल्प अभ्यास दौरा - जलविज्ञान, पर्यावरण व पुनर्वसन - अमेरिका, ब्राझिल व चीन (१९९८,१९९९, २०००)
* घाटघर - जलविद्युत प्रकल्प - मशिनरी उभारणीचा अभ्यास दौरा जपान (१९९९)
* आय.सी.आय.डी. परिषद माॅन्ट्रियल, कॅनडा (२००२) व मास्को, रशिया (२००४)
* स्टाॅकहोम, स्वीडन - वर्ल्ड वाॅटर वीक (२००६,२०१०,२०११)
* लॅट्रोब युनिव्हर्सिटी, मेलबर्न ऑस्ट्रेलिया - अभ्यास दौरा (२००६)
* जिनेव्हा, स्वित्झर्लंड - आंतरराष्ट्रीय लिगल परिषद - पर्यावरण - (२००७)
* वर्ल्ड वाॅटर फोरम, इस्तंबूल, तुर्कस्तान व मार्से, फ्रान्स (२००९-२०१२)
* ब्राझिल - जल व्यवस्थापन अभ्यास दौरा (२०१०)
* लिऑन, फ्रान्स - वर्ल्ड वाॅटर कौन्सिल परिषद (२०१४)

प्राधिकरणातील अभियांत्रिकी सदस्याचा कालावधी २०१६ मध्ये संपल्यानंतर लगेच माझ्या मूळ गावी सोलापूर येथील वालचंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी येथे तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून गेली ५ ते ६ वर्षे काम करत आहे.

Suresh Sodal | सुरेश सोडळ ह्यांची पुस्तके