Home / Authors / Sujata Godbole
Sujata Godbole
Sujata Godbole

सुजाता गोडबोले (जन्म ३ एप्रिल १९४४)

यांनी इंग्रजी व फ्रेंच हे विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. ही पदवी व फ्रेंच व भाषाशास्त्र या
विषयात एम. ए. ही पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली. १९७१- ७२ व १९८० साली फ्रेंच सरकारची अभ्यासवृत्ती मिळवून फ्रेंच भाषेचा व भाषा शिकविण्याच्या पद्धतींचा फ्रान्समध्ये विशेष अभ्यास केला. त्यांनी अनेक वर्षे मुंबई व दिल्लीतील शैक्षणिक संस्थांमध्ये फ्रेंच भाषेचे अध्यापन केले.

आकाशवाणीच्या दिल्ली व मुंबई केंद्रांवरून काही काळ नैमित्तिक वृत्तनिवेदक म्हणून मराठी बातम्या देण्याचे कामही त्यांनी केले. त्या दिल्लीच्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या दोन वर्षे मानद उपाध्यक्ष होत्या. त्यांनी दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी अनेक पुस्तके वाचून ध्वनिमुद्रितही केली आहेत.

‘* फाळणीचे हत्याकांड' - एक उत्तरचिकित्सा या अनुवादास नाशिक सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर पुरस्कार एप्रिल २००८ मध्ये प्रदान करण्यात आला.

* ‘भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा' या अनुवादास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिमंडळाचा तर्कतीर्थ लक्ष्मणशाश्त्री जोशी पुरस्कार फेब्रुवारी २०१४ मध्ये देण्यात आला. ‘

* गांधी प्रथम त्यांस पाहता' या पुस्तकास जानेवारी २०१७ मध्ये अशोक पाध्ये स्मृती पुरस्कार मिळाला आहे. एसीएन नंबियार या पुस्तकास ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा अनुवादासाठीचा श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्कार जून २०१९ मध्ये देण्यात आला आहे.


मराठीत अनुवादित केलेली पुस्तके
१. प्रिय डोरोथी: इंदिरा गांधींनी अमेरिकन मैत्रिणीस लिहिलेली पत्रे, संकलन व टीपा-डोरोथी नॉर्मन, राजहंस प्रकाशन, २०१८.
२. ‘एसीएन नंबियार', लेखक-वपाला बालचंद्रन, राजहंस प्रकाशन, २०१८.
३. ‘ भारताची धर्मनिरपेक्षता धोक्याच्या वळणावर', लेखक - माधव गोडबोले, राजहंस प्रकाशन, २०१७.
४. ‘दृष्टीआडच्या इंदिरा गांधी', लेखक - डॉ. के. पी. माथुर, राजहंस प्रकाशन, २०१७.
५. ‘गांधी: प्रथम त्यांस पाहता', लेखक - थॉमस वेबर, राजहंस प्रकाशन, २०१५.
६. ‘हरवलेले सुशासन', लेखक- माधव गोडबोले, विश्वकर्मा पब्लिकेशन्स २०१५.
७. ‘ग गणिताचा - गणितातील गमती', लेखक - अरिंवद गुप्ता, मनोविकास प्रकाशन, २०१४.
८. ‘गांधीजींचे असामान्य नेतृत्त्व', लेखक - अ‍ॅलन नाझरेथ, राजहंस प्रकाशन २०१४.
९. ‘मुलं नापास का होतात?', लेखक - जॉन होल्ट, मनोविकास प्रकाशन, २०१३.
१०. ‘भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा', लेखक - माधव गोडबोले, राजहंस प्रकाशन, २०१२.
११. ‘फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा', लेखक - माधव गोडबोले, राजहंस प्रकाशन, २००७.
१२. ‘शोधांच्या कथा', लेखक - आयझॅक असिमॉव्ह, प्रत्येकी ६ पुस्तकांचे सहा संच, मनोविकास प्रकाशन, २००८ व २०१२.

मराठी पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद
१. ‘टु कॅच अ थिफ', लेखक - गंगाधर गाडगीळ, साहित्य अ‍ॅकॅडमी, १९९७.
२. ‘द कॉस्मिक एक्स्लोजन', लेखक - जयंत नारळीकर, साहित्य अ‍ॅकॅडमी, १९९२.

Sujata Godbole ह्यांची पुस्तके