Home / Authors / Sudhir Bhaskar Sabale | सुधीर भास्कर साबळे
Sudhir Bhaskar Sabale | सुधीर भास्कर साबळे
Sudhir Bhaskar Sabale | सुधीर भास्कर साबळे

शिक्षण : एमकॉम, पुणे विद्यापीठ', सिंबायोसिस महाविद्यालय, पुणे.

* पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत. दै. महाराष्ट्र टाइम्स, दै. सकाळ या नामांकित वर्तमानपत्रांमध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून काम.

* शोध-पत्रकारितेमध्ये विशेष रुची. याखेरीज विविध मासिके, पाक्षिके, नियतकालिकांमधून विविध विषयांवर लिखाण. सामाजिक, राजकीय, साहित्य, क्रीडा, उद्योग, आरोग्य, कृषी अशा अनेक विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लिखाण.

* सायबर-गुन्हेगारी या विषयावर बातम्यांच्या आणि लेखांच्या माध्यमातून विस्तृत लिखाण. सायबर-गुन्हे या विषयावर कथांच्या
माध्यमातून समाजात प्रबोधन करण्याचा प्रयत्न. विविध विषयांवरील मराठी पुस्तकासाठी सहयोगी संपादन, निर्मितीचे काम.