Home / Authors / Subodh Javadekar | सुबोध जावडेकर
Subodh Javadekar | सुबोध जावडेकर
Subodh Javadekar | सुबोध जावडेकर

जन्मतारीख: १६ सप्टेंबर १९४८

शिक्षण: B. Tech. (Chemical Engineering)

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. कुरूक्षेत्र
२. मेदूतला माणूस
३. आपले बुद्धिमान सोयरे

विज्ञानलेखक म्हणून मराठी वाचकांना परिचित. त्यांची आतापर्यंत १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातले पाच विज्ञानकथासंग्रह असून बाकीही बहुतेक सर्व विज्ञानाशी संबंधित आहेत.

* त्यांच्या ‘कुरुक्षेत्र’ या कथासंग्रहास केशवराव कोठावळे पारितोषिक मिळाले असून
* तीन राज्य पुरस्कारांसकट इतरही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

* अलीकडची काही वर्षं ते मानवी मेंदू या विषयाचा अभ्यास करत आहेत. ‘मेंदूतला माणूस’ (डॉ. आनंद जोशी यांच्याबरोबर लिहिलेले) व ‘मेंदूच्या मनात’ ही त्यांच्या मेंदूविज्ञानावरील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

* त्यांच्या तीस कथांचे अनुवाद इंग्रजी, हिंदी, कन्नड, बंगाली व इतर भारतीय भाषांमध्ये झाले असून एका कथेचा अनुवाद तीन युरोपियन भाषांतही झाला आहे. भोपाळ दुर्घटनेवर आधारलेल्या त्यांच्या ‘आकांत’ या कादंबरीचा अनुवाद मल्याळम भाषेत झाला आहे.

* आयआयटी मधून रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर ते रसायन उद्योगात कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘जेकब्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीतून जनरल मॅनेजर या पदावरून निवृत्ती घेतली.

Subodh Javadekar | सुबोध जावडेकर ह्यांची पुस्तके