Home / Authors / Swanand Mukund Kulkarni | स्वानंद मुकुंद कुलकर्णी
Swanand Mukund Kulkarni | स्वानंद मुकुंद कुलकर्णी
Swanand Mukund Kulkarni | स्वानंद मुकुंद कुलकर्णी

कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमधून बारावीनंतर पाच वर्षांचा कायद्याचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार प्राप्त.

* १९९५ पासून दिवाणी, फौजदारी, सहकार आणि महसूल क्षेत्रात वकिली व्यवसाय.
* इचलकरंजी आणि परिसरातील विविध सहकारी संस्था, न्यास, औद्योगिक वसाहती, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका यांचे कायदेशीर सल्लागार.
* व्यवस्थापन महाविद्यालयात कायद्याचे मानद प्राध्यापक म्हणूनही काम.
* महाराष्ट्रातील एक अग्रगण्य ग्रंथालय असणाऱ्या इचलकरंजीच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ‘आपटे वाचन मंदिरा'चे, प्रथम संचालक, पुढे सहकार्यवाह आणि त्यानंतर दहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम.
* वाचनसंस्कृतीला बळ मिळावे आणि विशेषत: लहान मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून नावीन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी.
* इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (डीकेटीई) या संस्थेचे विश्वस्त. या संस्थेद्वारा प्राथमिक व माध्यमिक मराठी व इंग्रजी शाळा, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय. टी. आय., व्यवस्थापन महाविद्यालय आणि स्वायत्त टेक्स्टाइल व इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इ.चे संचालन. देशातील वस्त्रोद्योगाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाचा सन्मान.
* विविध नियतकालिकांमधून लेख प्रसिद्ध.
* प्रभावी वक्ते म्हणूनही लौकिक.

Swanand Mukund Kulkarni | स्वानंद मुकुंद कुलकर्णी ह्यांची पुस्तके