Home / Authors / Somnath Chatterjee, Tran:- Sharada Sathe
Somnath Chatterjee, Tran:- Sharada Sathe
Somnath Chatterjee, Tran:- Sharada Sathe

सोमनाथ चॅटर्जी (जन्म : तेजपूर-आसाम, २५ जुलै १९२९; - कलकत्ता, १३ ऑगस्ट २०१८)

हे मुळात कम्युनिस्ट पक्षाचे (CPIचे)नेते होते. १९६८ साली ते मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षात गेले. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार (CPI-Mचे उमेदवार) म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.

* अभ्यासू वृत्ती, आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला.. जुलै इ.स. २००८ मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे मार्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इ.स. २००९ची लोकसभा निवडणूक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.


*** शारदा साठे

या सुमारे ४५हून अधिक वर्षे साम्यवादी चळवळीत कार्यरत आहेत. भाऊ फाटक आणि एस.के. लिमये यांच्यामुळे त्या मार्क्स-लेनिनवादी विचारांकडे वळल्या आणि पुढे लाल निशाण पक्षाच्या सदस्या झाल्या. त्या एक उत्तम मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक समाजवादी-साम्यवादी नेत्यांची चरित्रे लिहिली आहेत.

* 'प्रेरक ललकारी' या स्त्री-चळवळीला वाहिलेल्या मासिकाच्या त्या २७हून अधिक वर्षे संपादक आहेत.

*** शारदा साठे यांची पुस्तके
* अलिप्त दृष्टिकोनातून (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पी. चिदंबरम)
* इतिहासाचा अनभिज्ञ यात्री : एका पुत्राचा इस्लामिक प्रदेशातील प्रवास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आतिश तसीर)
* गांधींनंतरचा भारत (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रामचंद्र गुहा)
* तत्त्वनिष्ठेची जपणूक (अनुवादित, मूळ लेखक - सोमनाथ चॅटर्जी)
* पांथस्थ (अनुवादित अात्मचरित्र, मूळ लेखक - मोहित सेन)
* ललकार ('प्रेरक ललकारी' या स्त्री मुक्ति संघटनेचे मुखपत्र असलेल्या मासिकात लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह)
* लोकशाहीचे व्याकरण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - न्यायमूर्ती पी.बी. सावंत)
* क्षितिजावरील शलाका (स्रीमुक्तिविषयक) दैनिक 'नवशक्ति'मध्ये 'आत्मभानाचे इतिहासाचे पान' या लेखमालिकेत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)

Somnath Chatterjee, Tran:- Sharada Sathe ह्यांची पुस्तके