Home / Authors / shrikant Lagoo
shrikant Lagoo

श्रीकांत लागू (इ.स. १९३५ - ७ मे, २०१३:वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र) हे विविध विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक आणि लागू बंधू मोतीवाले पेढीचे संचालक होते. लागू यांना नाटक, खेळ, गिरिभ्रमण, छायाचित्रण अशा अनेक विषयांत रुची होती.

* पुण्यात जन्मलेल्या लागू यांनी मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली. महाविद्यालयीन काळात श्रीलंकेत झालेल्या जलतरण स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.

* रंगायन, आविष्कार, रूपवेध आदी नाटय़ संस्थांशी ते निगडित होते. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘तुघलक’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’,’श्रीरंग प्रेमरंग’ आदी नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या.

* कैलास मानसरोवर ते अंटार्क्टिका हा प्रवासही त्यांनी केला होता. दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले.

*** पुस्तके
* अ‍ॅनिमल फार्म (अनुवादित)
* अमावास्येचा पूर्ण चंद्र (ग्रहणावरील पुस्तक)
* कथा एका राष्ट्रजन्माची (अनुवादित)
* केवळ मानवतेसाठी
* कोंदणसांगाती सह्य़ाद्रीचा, शिखरावरून
* झेपावलेले मुक्तिपंख (अनुवादित)
* ढाक्क्याची शरणागती
* मला निसटलंच पाहिजे (अनुवादित; मूळ लेखक - स्लाव्होमिर राविझ; शब्दांकन - रोनाल्ड डाउनिंग)
* विम्बल्डनच्या तृणांगणावर
* शिखरावरून
* सागरसफर तृष्णाची
* सांगाती सह्य़ाद्रीचा

shrikant Lagoo ह्यांची पुस्तके