Home / Authors / Shreepad Achyut Dabholkar, Arun dike | श्रीपाद अच्युत दाभोलकर / अरुण डिके
Shreepad Achyut Dabholkar, Arun dike | श्रीपाद अच्युत दाभोलकर / अरुण डिके

जन्म : २२ मार्च १९४०
शिक्षण : एम.एससी. (कृषी विज्ञान) विक्रम विद्यापीठ, उज्जैन १९६४

सदस्यत्व :
* सल्लागार, विकास सेवा, दिल्ली.
* भारतीय सेंद्रिय शेती संघटना, गोवा.
* भारत कृषक समाज, नवी दिल्ली.
* प्रकृती, मुंबई.

अनुभव :
* संशोधन साहाय्यक (कापूस), जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय, कृषी महाविद्यालय, इंदूर
१९६४ ते १९६७.
* सायनामिड इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र येथील
कीटकनाशकाच्या निर्मिती आणि विपणनाचे कार्य १९६७ ते १९७३.
* पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठ्या ऊस फवारणीवर निरीक्षक म्हणून कार्य १९६९ ते १९७०.
* फार्म सर्व्हिस, इंदूर या व्यापारी संघटनेची स्थापना आणि कार्य १९७३ ते १९८६.
* `इंदूर बायोटेक इनपुट्स अँड रिसर्च प्रा. लि.'ची स्थापना आणि जैविक खते आणि कीटकनाशके
उत्पादनाचे कार्य.

शेतकर्‍यांसाठी सेवाकार्य :
* विषारी रसायने आणि बुरशीनाशकांपासून बियाणांचे शुद्धीकरण करण्याच्या उपकरणाची - `किसान सीड ड्रेसर' - भारतात प्रथमच निर्मिती.
* `ग्रॅन्यूल गन' या शेतीविषयक उपयुक्त उपकरणाची भारतात प्रथमच निर्मिती.

कृषिक्षेत्रात पर्यावरण संरक्षणविषयक कार्य :
* ग्रामीण आणि शहरी भागातील कचर्‍याचे उपयुक्त खतात रूपांतर करणार्‍या गाडंळू खत प्रकल्पाची मध्य प्रदेश राज्यात सर्व प्रथम काम सरुवात आणि प्रसार.

कृषिशिक्षण क्षेत्रात नैपुण्य :
* शेतकर्‍यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी विविध साधने - फिरती प्रदर्शने, आलेख, भित्तिपत्रके, स्लाईड शो, लघुपट आणि पथनाट्ये.
* घातक कीटकनाशकांवर दूरदर्शनवर लघुपट
* `सेंद्रिय शेती' या विषयावर आकाशवाणीवर व्याख्याने.

प्रकाशित साहित्य :
* जैविक खेती के प्रमुख सूत्र (हिंदी)
* हमारी खेती : कल, आज, कल (हिंदी)
* अ‍ॅन अ‍ॅग्रिकल्चर टेस्टामेंट : सर अल्बर्ट हॉवर्ड (मराठी/हिंदी)

संस्थात्मक कार्य :
* रंगवास इन्स्टिट्यूट ऑफ बायोव्हिलेज, रंगवास, जि. इंदूर या संस्थेचे अध्यक्ष. संस्थेतर्फे ग्रामीण
विकासासाठी विविध योजना.

Shreepad Achyut Dabholkar, Arun dike | श्रीपाद अच्युत दाभोलकर / अरुण डिके ह्यांची पुस्तके