Home / Authors / Shobha Bhagwat
Shobha Bhagwat

शोभा भागवत (२९ ऑगस्ट, १९४७ - ८ डिसेंबर, २०२३)

*** या बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका होत्या. त्या पुण्यातील गरवारे बालभवनच्या संचालिका होत्या.

*** पुस्तके
* आपली मुलं (मार्गदर्शनपर)
* गंमतजत्रा (बालसाहित्य)
* गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर)
* बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक - अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे.
* मूल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन)
* विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कृष्णकुमार). - मार्गदर्शनपर.
* सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर)

* पती अनिल भागवत यांच्यासोबत त्यांनी स्थापन केलेल्या 'विवाह अभ्यास मंडळा'चंही काही पिढ्यांना मोठं आकर्षण होतं.

* गरवारे बालभवनाच्या मोक्याच्या जागेवर काही राजकारणी मंडळींचा डोळा होता. मुलांच्या हक्काची जागा जाऊ नये, म्हणून शोभाताईंसोबत पुण्यातील अनेक पालक उभे राहिले आणि त्यांनी अखेर ही जागा वाचविली.

* शोभाताईंचं सगळं आयुष्यच मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी समर्पित होतं. त्यांनी मुलांसाठी व पालकांसाठी ४० हून अधिक पुस्तकं लिहिली. हजारो व्याख्यानं दिली.

* पुण्यातील अनेक शाळांच्या नियामक मंडळांवर त्यांनी काम केलं.

* पुणे महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.

Shobha Bhagwat ह्यांची पुस्तके