Home / Authors / Sharad Pawar
Sharad Pawar
Sharad Pawar

शरद गोविंदराव पवार (१२ डिसेंबर १९४०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. ते भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत.

शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, अजित पवार हे त्यांचे पुतणे, रोहित राजेंद्र पवार हे पुतण्याचे पुत्र आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे

*** चरित्रे आणि आत्मचरित्र
* साहेब (शरद पवार चरित्रग्रंथ), लेखक व संपादक - सोपान गाडे
* लोकनेते शरदराव पवार (लेखक - राम कांडगे)
* Sharad Pawar - A Mass Leader (लेखक - दीपक बोरगावे)
* शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.

*** पुरस्कार
* पद्मविभूषण (२०१७)

Sharad Pawar ह्यांची पुस्तके