Home / Authors / Satish Alekar
Satish Alekar
Satish Alekar

सतीश आळेकर
जन्म : ३० जानेवारी १९४९ (नवी दिल्ली)
शिक्षण : १९७२ एमएससी (बायोकेमिस्ट्री), पुणे विद्यापीठ

*** प्रकाशित स्वतंत्र नाटके
* मिकी आणि मेमसाहेब (प्रथम प्रयोग, १ डिसेंबर १९७३)
* महानिर्वाण (प्रथम प्रयोग २२ नोव्हेंबर १९७४) - थिएटर अ‍ॅकॅडेमी निर्मित, दिग्दर्शन : सतीश आळेकर
* महापूर (९ नोव्हेंबर १९७५) - थिएटर अ‍ॅकॅडेमी निर्मित, दिग्दर्शन : मोहन गोखले
* बेगम बर्वे (प्रथम प्रयोग, १९ मार्च १९७९) - थिएटर अ‍ॅकॅडेमी निर्मित, दिग्दर्शन : सतीश आळेकर
* शनवार-रविवार (प्रथम प्रयोग, ५ मे १९८२) - थिएटर अ‍ॅकॅडेमी निर्मित, दिग्दर्शन : सतीश आळेकर
* दुसरा सामना (प्रथम प्रयोग, २ मार्च १९८९) - व्यावसायिक नाटक निर्मिती कलावैभव, मुंबई, दिग्दर्शन : वामन केंद्रे
* अतिरेकी (प्रथम प्रयोग २७ मार्च १९९०) - थिएटर अ‍ॅकॅडेमी निर्मित, दिग्दर्शन : सतीश आळेकर
* पिढीजात (प्रथम प्रयोग, ३१ मे २००३) - महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित, दिग्दर्शन : गिरीश जोशी

*** अप्रकाशित स्वतंत्र नाटके
* एक दिवस मठाकडे (दीर्घाक) (प्रथम प्रयोग, ३ मार्च, २०१३) नाटक कंपनी, पुणे निर्मित, दिग्दर्शन : निपुण धर्माधिकारी

*** अप्रकाशित रुपांतरीत नाटके
* प्रलय (१९८५ जर्मन लेखक गुंथर ग्रास यांच्या ‘द फ्लड’ या नाटकाचे मराठीकरण, दिग्दर्शन - सतीश आळेकर, थिएटर अ‍ॅकॅडेमी निर्मित)

*** स्वतंत्र प्रकाशित एकांकिका
* मेमरी (१९६९)
* भजन (१९६९)
* सामना (१९६९)
* एक झुलता पूल (१९७१)
* दार कोणी उघडत नाही (१९७९)
* बस स्टॉप (१९८०)

*** प्रकाशित रूपांतरित / भाषांतरित/ आधारित एकांकिका
* जज्ज (१९६८)
* यमूचे रहस्य (१९७६)
* भिंत (१९८०)
* वळण (१९८०)
* आळशी अत्तरवाल्याची गोष्ट (१९९९)
* नशीबवान बाईचे दोन (१९९९)
* सुपारी (२००२)
* कर्मचारी (२००९)

*** अन्य भाषेत गेलेली स्वतंत्र नाटके
* मिकी आणि मेमसाहेब : इंग्रजी, हिंदी
* महानिर्वाण : इंग्रजी, रशियन, बंगाली, गुजराथी, हिंदी, तमिळ, राजस्थानी, पंजाबी, डोग्री, कोंकणी
* महापूर : इंग्रजी, हिंदी
* बेगम बर्वे : इंग्रजी, गुजराथी, हिंदी
* शनवार रविवार : हिंदी
* दुसरा सामना : हिंदी
* अतिरेकी : इंग्रजी
* पिढीजात : इंग्रजी, बंगाली

*** अन्य भाषेत प्रकाशित पुस्तके
इंग्रजी
Collected Plays of satish Alekar by Oxford University Press, Delhi (2011, 2013)
(या पुस्तकात मिकी आणि मेमसाहेब, बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर, अतिरेकी, पिढीजात अशा सहा नाटकांचे भाषांतर)
Dead Departure (Mahanirvan), Published by Seagull Books, Kolkata (1996, 2012)
Begam Barve, Published by Seagull Books, Kolkata (1997, 2005)


*** हिंदी
* महानिर्वाण (भाषांतर : वसंत देव) विद्या प्रकाशन मंदिर, दिल्ली (१९८५)
* बेगम बर्वे (भाषांतर : वसंत देव) नॅशनल स्कूल ऑफ पूना, दिल्ली (२००३)

*** सतीश आळेकर यांच्या नाटकांवर प्रकाशित टीका पुस्तके
* महानिर्वाण : समीक्षा आणि संस्मरणे, सं. रेखा इनामदार-साने, राजहंस प्रकाशन (१९९९, २००८)
न् बेगम बर्वे विषयी, सं. रेखा इनामदार-साने, राजहंस प्रकाशन (२००८)

*** मराठी चित्रपट पटकथा संवाद लेखन
* जैत रे जैत (१९७७ सहलेखन अनिल जोगळेकर) दिग्दर्शन : जब्बार पटेल

*** मराठी चित्रपट संवाद लेखन
* कथा दोन गणपतरावांची (१९९६ पटकथा : शांता गोखले, दिग्दर्शन : अरुण खोपकर)

*** हिंदी दूरदर्शन मालिका
* देखो मगर प्यारसे (१९८५, दिग्दर्शन : सतीश आळेकर, संवाद : मृणाल पांडे)

*** रंगमंच अभिनय
* १९७१ एक झुलता पूल (भूमिका : तरुण)
* १९७४ महानिर्वाण (भूमिका : नाना)
* १९७९ बेगम बर्वे (भूमिका : जावडेकर)
* १९८२ शनवार रविवार (भूमिका : नवरा)
* १९८२ एकांकिका बोट फुटली (भूमिका : इसम, दिग्दर्शन : समरनखाते, लेखन : माधुरी पुरंदरे, थिएटर अ‍ॅकॅडेमी निर्मिती)

*** मराठी चित्रपट अभिनय
* अक्रित (१९८१, भूमिका : पत्रकार, दिग्दर्शन : अमोल पालेकर)
* उंबरठा (१९८२, भूमिका : ट्रस्टी, दिग्दर्शन : जब्बार पटेल)
* एक होता विदूषक (१९९२, भूमिका : डॉक्टर, दिग्दर्शन : जब्बार पटेल)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९१, भूमिका : बॅ. जयकर, दिग्दर्शन : जब्बार पटेल)
* कथा दोन गणपतरावांची (१९९६, भूमिका : जज्ज, दिग्दर्शन : अरुण खोपकर)
* ध्यासपर्व (२००१, भूमिका : डॉक्टर, दिग्दर्शन : अमोल पालेकर)
* चिंटू (२०१२, भूमिका : कर्नल काका, दिग्दर्शन : श्रीरंग गोडबोले)
* चिंटू-२ (खिजन्याची चित्तर कथा (२०१३, भूमिका : कर्नल काका, दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले
* होऊन जाऊद्यात : ों arा ध्ह! (२०१३, भूमिका : ज्येष्ठ नागरिक, दिग्दर्शन : अमोल पालेकर)
* म्हैस (२०१३, भूमिका : मास्तर, दिग्दर्शन : शेखर नाईक)
* आजचा दिवस माझा (२०१३, भूमिका : जज्ज, दिग्दर्शन : चंद्रकांत कुलकर्णी)
* यशवंतराव चव्हाण : कथा एका वादळाची (२०१४, भूमिका : आचार्य भागवत, दिग्दर्शन जब्बार पटेल)
* देऊळ बंद (२०१५, भूमिका : सोसायटीचे चेअरमरन, दिग्दर्शन : प्रवीण तरडे)
* वेलकम जिंदगी (२०१५, भूमिका : प्राध्यापक, दिग्दर्शन : उमेश घाटगे)
* हाय वे (२०१५, भूमिका : प्रवासी, दिग्दर्शन : उमेश कुलकर्णी)
* राजवाडे अँड सन्स (भूमिका : राजवाडे, दिग्दर्शन : सचिन कुंडलकर)
* जाऊद्या ना बाळासाहेब (२०१६, भूमिका : पाहुणा कलाकार, दिग्दर्शन : गिरीश कुलकर्णी)
* व्हेंटीलेटर (२०१६ भूमिका : भाऊ, दिग्दर्शन : राजेश मापुस्कर)

*** हिंदी चित्रपट अभिनय
* एक कहानी नयी (१९८४, भूमिका : डॉक्टर, दिग्दर्शन : बिप्लव राय चौधरी)
* दुमकटा (२००७, भूमिका : पडोसी, दिग्दर्शन : अमोल पालेकर)
* अय्या (२०१२, भूमिका : पिता, दिग्दर्शन : सचि कुंडलकर)
* देख तमाशा देख (२०१४, भूमिका : प्रोफेसर, दिग्दर्शन : फिरोज अब्बासखान)

*** जाहिरातीसाठी अभिनय
* टाटा स्काय (२०१०)
* न्यूयॉर्क लाइफ इन्शुरन्स (२०१२)
* होंडा अमेझ (२०१३)
* आयडिया मोबाईल (२०१३)
* स्नॅपडील (२०१६)

*** काही पुरस्कार
* १९७५ : महापूर उत्कृष्ट नाट्य संहिता, राज्य नाट्य पुरस्कार
* १९७४ : राम गणेश गडकरी पुरस्कार (महानिर्वाणसाठी) महाराष्ट्र राज्य शासन
* १९९२ : नांदिकार सन्मान, कोलकाता
* १९९४ : संगीत नाटक अकादमी, दिल्ली : नाट्य लेखन पुरस्कार
* १९९९ : नाट्यदर्पण जीवन गौरव
* २००५ : पुणे विद्यापीठाचा प्रा. व्ही. के. जोग शिक्षण पुरस्कार
* २००५ : राम गणेश गडकरी नाट्यलेखन गौरव, नाट्य परिषद, मुंबई
* २००७ : नाटकककार वि. वा. शिरवाडकर, स्मती पुरस्कार, नाट्य परिषद, नाशिक
* २०१२ : पद्मश्री
* २०१४ : आरती प्रभू (चिं. त्र्यं, खानोलकर) स्मृती पुरस्कार

*** काही आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती
* १९८३ : न्यूयॉर्कच्या एशियन कल्चरल कौन्सिलची अमेरिकन नाट्य अभ्यास वृत्ती सहा आठवडे
* १९८३ : फोर्ड फौंडेशनची प्रवासवृत्ती : थायलंड, चीन, जपान, इंडोनेशिया मधील नाटकांचा अनिभाव घेण्यासाठी (सहा आठवडे)

*** परदेशी विद्यापीठात अतिथी प्राध्यापक
* १९९४ : ड्युक्युनिव्हर्सिटी, डूरम, नॉर्थ कॅरॉलीना, यूएसए (चार महिने)
* २००३ : टीश स्कूल ऑफ आर्ट्स, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी (फुलब्राईट फेलो, चार महिने)
* २००५ : जॉर्जीया युनिव्हर्सिटी (अ‍ॅटलांटा-अथेन्स), यूएसए (चार महिने)

*** सन्मानवृत्ती
* २०१४ : पुणे विद्यापीठात ख्यातनाम प्राध्यापक (Distinguished Professor) या सन्मानित पदावर नंतर पाच वर्षांसाठी नेमणूक (२०१४ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत)

Satish Alekar ह्यांची पुस्तके