Home / Authors / Sanjay Mangrulkar | डॉ. संजीव मंगरूळकर
Sanjay Mangrulkar | डॉ. संजीव मंगरूळकर

शिक्षण : एम. डी. (मेडिसीन), पुणे विद्यापीठ (१९८२)
एम.डी.च्या परीक्षेत सर्वप्रथम. सुवर्णपदकाचे मानकरी.
पुण्यात गेली अडतीस वर्षे कन्सल्टिंग फिजिशिअन म्हणून कार्यरत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे येथे मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून काम. सध्या त्या रुग्णालयात मानद फिजिशिअन.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सतर्पेâ घेतल्या जाणार्‍या डी.एन.बी.' परीक्षांसाठी पदव्युत्तर अध्यापनाचे कार्य.
वैद्यकीय व्यवसायासाठी सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये गेली तीस वर्षे आघाडीवर राहून काम.
आपल्या वैद्यकीय व्यवसायात तर्कनिष्ठा आणि नैतिक मूल्यांच्या जपणुकीबाबत आग्रही.
डॉ. संजीव मंगरूळकर अत्यंत जाणकार वाचक तर आहेतच, पण साहित्यिक क्षेत्रात लेखक म्हणूनही योगदान देतात.
आपल्या वैद्यकीय व्यवसायातील अनवट अनुभवांवर आधारित संजीव म्हणे' हा ब्लॉग `ब्लॉगस्पॉट' आणि `वर्डप्रेस'वर लिहीत होते. हा त्यांचा ब्लॉग अतिशय गाजला. हजारो वाचकांनी तो वाचला आणि नावाजला.
मधुमेहाच्या रुग्णांना त्या आजाराबद्दल आवश्यक ती माहिती करून देण्यासाठी काही वृत्तपट बनवण्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. हे वृत्तपट दूरदर्शनवर प्रदर्शित झाले. त्यांना विविध थरांमधून
प्रशंसा लाभली.
ते निव्वळ `कानसेनी' संगीतप्रेमी नाहीत, तर पट्टीचे सतारवादक आहेत.
सदर पुस्तक हे डॉ. संजीव मंगरूळकरांनी लिहिलेले पहिलेच मराठी पुस्तक आहे. त्यांनी तीन तपांहून अधिक काळ केलेली वैद्यकीय व्यवसायसाधना आणि या प्रवासात विवेकबुद्धीला कुरतडणारी कसर यांचे फलित म्हणजे हे पुस्तक.

Sanjay Mangrulkar | डॉ. संजीव मंगरूळकर ह्यांची पुस्तके