Home / Authors / Sai Paranjpye
Sai Paranjpye
Sai Paranjpye

सई परांजपे (१९ मार्च, इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.

* सई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखिका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्‍त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.

* चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या.

*** सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेली प्रमुख नाटके
* एक तमाशा सुंदरसा (या नाटकात सुहास भालेकर भूमिका करत)
* गीध
* जादूचा शंख (बालनाट्य)
* झाली काय गंमत (बालनाट्य)
* धिक्‌ ताम्‌
* पत्तेनगरी (बालनाट्य)
* पुन्हा शेजारी
* माझा खेळ मांडू दे
* शेपटीचा शाप (बालनाट्य)
* सख्खे शेजारी

*** सई परांजपे यांचे चित्रपट
* कथा (१९८३)
* चष्मेबद्दूर (१९८१)
* चुडिया (१९९३)
* दिशा (१९९०)
* साज (१९९७)
* स्पर्श (१९८०)

*** सई परांजपे यानी लिहिलेली पुस्तके
* आलबेल (नाटक)
* जादूचा शंख (बालसाहित्य)
* जास्वंदी (बालनट्य)
* झाली काय गंमत (बालसाहित्य)
* नसीरुद्दीन शाह आणि मग एक दिवस (अनुवादित आत्मचरित्र, मूळ इंग्रजी And Then One Day, लेखक नसीरुद्दीन शाह)
* भटक्याचें भविष्य (बालसाहित्य)
* मुलांचा मेवा (बालसाहित्य)
* शेपटीचा शाप (बालसाहित्य)
* सख्खे शेजारी (नाटक)
* सय-माझा कलाप्रवास
* सळो की पळो (बालसाहित्य)

*** पुरस्कार
* अनेक चित्रपटांना पुरस्कार
* १९८५चा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - ’स्पर्श’ या चित्रपटासाठी
* १९९३ साली ‘चुडिया’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार
* २००६ सालचा पद्मभूषण पुरस्कार
* २०१२ सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर सन्मान
* २०१२ सालचा राजा परांजपे पुरस्कार
* २०१७ सालचा (पाचवा) आरती प्रभू पुरस्कार

* मसापचा २०१७ सालचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - सई परांजपे यांच्य ‘सय-माझा कलाकार’ या पुस्तकाला.
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य पुरस्कार (१३-१-२०१८)

Sai Paranjpye ह्यांची पुस्तके