Home / Authors / Rekha Deshpande | रेखा देशपांडे
Rekha Deshpande | रेखा देशपांडे
Rekha Deshpande | रेखा देशपांडे

* 'माधुरी', 'धर्मयुग', 'जनसत्ता', स्क्रीन', 'लोकसत्ता', या नियतकालिक वृत्तपत्रांतून पत्रकार आणि चित्रपटसमीक्षक म्हणून ओळख असलेल्या रेखा देशापांडे यांची 'रुपेरी', 'चांदण्याचे कण'. 'स्मिता पाटील', 'नाटिका', 'मराठी चित्रपट सृष्टीचा समग्र इतिहास', 'तारामतीचा प्रवास : भारतीय चित्रपट सृष्टीतील स्त्री चित्रणाची शंभर वर्षे' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

* ललित साहित्याव्यतिरिक्त इतिहास, समाजशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील त्यांच्या ३५ हून अधिक पुस्तकांचे हिंदी, मराठी अनुवाद प्रसिध्द झाले असून त्यात ॲगाथा ख्रिस्ती, जोनाथन गिल हॅरिस, पु. ल. देशपांडे , सुनीता देशपांडे, डॉ. जयंत नारळीकर, गंगाधर गाडगीळ, एम. जे. अकबर, रवींद्र केळेकर, डॉ. फौजिया सईद, शिवदयाल, विनया जंगले, उषा मेहता इत्यादी प्रतिष्ठित लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

* त्या गेली चाळीस वर्षे हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांतून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे चित्रपट महोत्सवांतून समीक्षक ज्युरीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

* ९० च्या दशकात दूरदर्शनसाठी 'सावल्या' (मराठी), 'कालचक्र' व 'आनंदी गोपाल' (हिंदी) या मालिकांचे पटकथा-संवादलेखन त्यांनी केले असून 'कथा तिच्या लग्नाची' या मराठी चित्रपटासाठी पटकथा-संवादाचे सह्लेखनही केले आहे.

Rekha Deshpande | रेखा देशपांडे ह्यांची पुस्तके