Home / Authors / Ratnakar Matkari
Ratnakar Matkari
Ratnakar Matkari

रत्‍नाकर मतकरी (जन्म : १७ नोव्हेंबर १९३८; - मुंबई, १८ मे २०२०)[१] -[२]) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते.

* मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.

* वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, ‘बालनाट्य’ व ‘सूत्रधार’ या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, दूरदर्शनवरील ‘शरदाचे चांदणे’ व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते.. असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते.

*** रत्नाकर मतकरींचा साहित्य प्रवास
* बावीस नाटके,
* अनेक एकांकिका,
* २३ कथासंग्रह,
* तीन कादंबऱ्या,
* बारा लेखसंग्रह,
* आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींचे विपुल साहित्यसंपदा आहे. ‘
* गहिरे पाणी’, ‘
* अश्वमेध’, ‘
* बेरीज वजाबाकी’ या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन रत्नाकर मतकरींचे होते.
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामेही रसिकप्रिय ठरली आहेत.

* रत्नाकर मतकरी यांच्या 'निर्मनुष्य' या कथासंग्रहातील 'भूमिका' या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते.

* २००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत.
* संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य अ‍ॅकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो.

रत्‍नाक्षरं - रत्‍नाकर मतकरींचा 'रत्‍नाक्षरं' हा ग्रंथ चार भागांत विभागला गेला आहे.
* पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे.
* दुसऱ्या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य-प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
* तिसऱ्या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचांचा समावेश करण्यात आला आहे.
* चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.

*** रत्नाकर मतकरी यांना मिळलेले पुरस्कार
* १९७८ : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार
* केंद्र शासनाचे डिरेक्टरेट ऑफ कल्चर अँड एजुकेशन, नवी दिल्ली यांची सामाजिक जाणिवेचा ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून २ वर्षांची शिष्यवृत्ती (१९८२, १९८३)
* महाराष्ट्र राज्य शासनाचे व इतर मिळून, २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार.
* तात्त्विक कारणांसाठी शासनाचे २ पुरस्कार नाकारले. त्यापैकी एक प्रित्यर्थ संपादक ग. वा. बेहेरे यांचा 'स्वाभिमान पुरस्कार'
* १९८६ : उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)
* नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार
* १९८५ : अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार
* १९८५ : राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार
* १९९७: गंगाधर गाडगीळ पुरस्कार
* १९९८: सु. ल. गद्रे पुरस्कार
* १९९९ : नाट्यव्रती पुरस्कार
* २००३ : संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
* २००५: फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार
* २००७: महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांचा विशेष साहित्य गौरव पुरस्कार
* २०१०: महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार
* २०११: दूरदर्शन 'साहित्य रत्न' पुरस्कार
* २०११: विष्णूदास भावे पुरस्कार, सांगली
* २०१२: सर्वोत्कृष्ट चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह रौप्यकमळ
* २०१३: दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
* २०१४: चतुरंग 'जीवन गौरव' पुरस्कार
* २०१५: मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळातर्फे 'उद्योग भूषण' पुरस्कार
* २०१६: 'इंदिरा' या पुस्तकाला गोवा हिंदू असो.चा सुभाष भेंडे पुरस्कार
* २०१६ : ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार
* २०१६ : शांता शेळके पुरस्कार
* २०१७: नालंदा डान्स रिसर्च सेंटरचा भरतमुनी सन्मान
* २०१८ : साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार

*** गौरव
१९८३: भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्ती

Ratnakar Matkari ह्यांची पुस्तके