Home / Authors / Ramdas Bhatkal | रामदास भटकळ
Ramdas Bhatkal | रामदास भटकळ
Ramdas Bhatkal | रामदास भटकळ

रामदास गणेश भटकळ (जन्म - ५ जानेवारी १९३५) हे पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

* इ.स. १९५२मध्ये, वयाच्या १७व्या वर्षी, त्यांनी इंग्रजी आणि मराठी पुस्तके प्रसिद्ध करण्यासाठी पॉप्युलर प्रकाशन नावाची एक खासगी प्रकाशन संस्था काढली. ही संस्था साठाहून अधिक वर्षे पुस्तके छापून प्रकाशित करत आली आहे. रामदास भटकळ यांचे शालेय शिक्षण मुंबईतील रॉबर्ट मनी हायस्कूलमधून, कॉलेजचे एलफिन्स्टन कॉलेजमधून व गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेजधून झाले. ते मुंबई विद्यापीठाचे एम.ए. (राज्यशास्त्र), एल्एल.बी. आहेत.

* इ.स.१९६१ मध्ये प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडन येथील इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेसमध्ये त्यांनी तीन महिन्यासाठी नोकरी केली. त्यानंतर त्यांंनी इंग्लंडमधील ग्रंथव्यवहाराचा अभ्यास आरंभला.

* भटकळांनी इ.स. १९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोमार्फत मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाचे व इ.स. १९५८ पासून इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशनाचे काम सुरू केले. त्यांची ही संस्था इंग्रजीत सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरची फक्त उच्च दर्जाची विचारप्रवर्तक पुस्तके छापते. तर मराठीत या संस्थेतर्फे इतिहास, संगीत, समाजशास्त्र या विषयांची पुस्तके आणि ललित वाङ्‌मय प्रकाशित होते.

* रामदास भटकळ हे नाव प्रकाशक म्हणून येण्याआधी शे-दीडशे कार्यक्रमांमधून गायले होते. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी रागदारी संगीताच्या मैफली गाजवल्या होत्या आणि बुवा, पंडित या उपाध्या मिरवल्या होत्या.

* भटकळांनी पंडित एस.सी.आर. भट यांच्याकडे त्यांनी काही वर्षं शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि मैफलीही केल्या. संगीतकार यशवंत देव यांच्याकडे ते भावगीतेही शिकले होते, पण पुढे प्रकाशन व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे रामदास भटकळांना गाण्याकडे फारसे लक्ष देता आले नाही.

* इ.स. २०१३ साली झालेल्या एका कार्यक्रमात रामदास भटकळ यांनी बालकवींची 'आनंदी आनंद गडे ' ही कविता एखाद्या दिग्गज गायकाप्रमाणे रागदारीत गाऊन दाखविली..

*** रामदास भटकळ यांनी लिहिलेली पुस्तके
* जगदंबा (गांधी आणि कस्तुरबा यांच्या संबंधी)
* जिगसॉ (आयुष्यात भेटलेल्या अविस्मरणीय व्यक्तींबाबत)
* जिव्हाळा (प्रकाशन व्यवसायात संपर्कात आलेल्या लेखकांसंबंधी)
* पॉप्युलर रीतिपुस्तक (लेखक, संपादक, मुद्रक, मुद्रितशोधक, प्रकाशक यांच्यासाठी उपयुक्त माहितीचे पुस्तक)
* द पोलिटिकल आल्टर्नेटिव्ह्ज इन इंडिया (संपादन)
* मोहनमाया (मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनावरील पुस्तक)
* रिंगणाबाहेर (भटकळांच्या प्रकाशन व्यवसायाबाहेरच्या गायन, राजकारण आणि नाटक या क्षेत्रांसंबंधी)

*** सन्मान
* रामदास भटकळ यांनी फ्रॅंकफुर्ट येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा भाग घेतला आहे.
* बॉम्बे बुकसेलर्स ॲन्ड पब्लिशर्स असोशिएशनचे ते भूतपूर्व अध्यक्ष आहेत.
* कॅपेक्सिल या निर्यातदारांच्या संस्थेच्या बुक्स ॲन्ड पब्लिकेशन पॅनेलचेही ते अध्यक्ष होते.
* रामदास भटकळ हे १९८६ साली औरंगाबाद येथे झालेल्या दुसऱ्या प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
* पुस्तकांच्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचे सरकारमान्य चेरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
* महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे ते मानकरी होत.
* जानेवारी २०१४ मध्ये रामदास भटकळ यांची ई-टीव्हीवरील ’संवाद’ कार्यक्रमात मुलाखत झाली होती. ती मुलाखत अनेक नामवंतांनी नावाजली.

Ramdas Bhatkal | रामदास भटकळ ह्यांची पुस्तके