Home / Authors / Rajkumar Badole | राजकुमार बडोले
Rajkumar Badole | राजकुमार बडोले
Rajkumar Badole | राजकुमार बडोले

जन्म : २८ मार्च १९६२
शिक्षण : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, एम.ए. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा )

१९८४ ते २००८ सिंचन विभाग (जि.प.) अभियंता म्हणून कार्यरत. गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे शिक्षणाची आवड असूनही कौटुंबिक जबाबदारीमुळे सरकारी नोकरीत रुजू.

* ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची दयनीय स्थिती, भूमिहीन, मजुरांचे व शोषित-वंचिताचे जगण्याचे चटके लहानपणापासून अनुभवल्यामुळे त्यांच्या दु:खमुक्तीसाठी निर्माण झालेली सुप्त भावना यातूनच
समाजकार्याची आवड.
* अनेक सामाजिक उपक्रम करीत असताना २००९ मध्ये राजिनामा देऊन विधानसभेवर निवडून आले. २०१४ ते २०१९ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात सामाजिक
न्याय व विषेश सहाय्य खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत.
* याच कार्यकाळात लंडन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर २०२०-२१ या वर्षात लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्समध्ये शिकत असताना राहत असलेले १०, िंकग्स हेन्री रोड हे घर सामाजिक न्याय विभागाने
खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले.
* इंदू मिल येथील साडे-बारा एकर जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येऊन ४५० फूट उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुतळा उभारला जात आहे. या स्मारकाचे भूमिपूजन भारताचे
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी केले होते. या स्मारकाचा आराखडा पूर्ण करणार्‍या एकसदस्यीय समितीचे प्रमुख म्हणून कार्य केले.
* मुंबई येथे ‘संत रविदास सामाजिक भवन’ उभारण्यास मान्यता दिली.
* जगात प्रथम रँक असलेल्या १०० विद्यापीठात प्रवेशाची संधी मागासवर्गीयांना मिळावी, म्हणून सा.न्या.विभागाच्या योजनेत आर्थिक निकष शिथिल केले.
* सामाजिक न्याय विभागापासून ओबीसी, विजाभज यांना न्याय देण्याच्या हेतूने बहुजन कल्याण विभाग वेगळा करण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात सा.न्या. विभागाने घेतला.
* दीक्षाभूमी,चिंचोली, ड्रॅगन पॅलेस टे्रिंनग सेंटर, चोखामेळा वसतिगृह, तळेगाव दाभाडे, इत्यादी वास्तूंसोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले या महामानवांच्या जीवनाशी निगडित
स्थळांच्या विकासासाठी निधी देऊन विकास करण्याची योजना करण्यात आली. आंबेडवे, मंडणगर, वाटेगाव, भिडेवाडा इत्यादी स्थळांचा विकास करण्याचे नियोजन.
* महाज्योती, सारथी या संस्थांचा पाया सा.न्या.विभागाने त्यांच्या कार्यकाळात रचला.
* ३० जानेवारी १९२० ला ‘मूकनायक' हे साप्ताहिक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते. त्याच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून ३० जाने २०१९ ला दि¼ी येथे ‘मूकनायक' पुरस्कार माध्यमातील
प्रसिद्ध व्यक्तींना देण्यात आले.
* महाराष्ट्रात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता नवीन संहिता जाहीर करण्यात आली.
* बौध्द विवाह कायद्याचा मसुदा तयार करून राज्य सरकारला देण्यात आला.
* सा.न्या.विभागाचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये व व्यपगत होऊ नये, म्हणून मसुदा राज्य सरकारला सादर करण्यात आला.
* चैत्यभूमी व कूपर रोडवरील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ‘भीमज्योत' सतत प्रज्वलित ठेवण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आला.
* २०१९ मध्ये ‘युगंधर व्रिâएशन्स' ही चित्रपटनिर्मिती संस्था स्थापन करून ‘दाह' या सामाजिक चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी व सौ. शारदा बडोले यांनी रचित ‘युगंधर' गीतांचे ध्वनीमुद्रण करण्यात आले. त्यात हरिहरन, शंकर महादेवन, बेला शेंडे, डॉ.अनिल खोब्रागडे,आदर्श शिंदे यांनी गीते गायिली आहेत.
* मुंबई येथील ‘गेट वे ऑफ इंडिया' येथे विश्वशांती परिषद, महार रेजिमेंटचा वर्धापनदिन भव्य रितीने साजरा करण्यात आला.
* त्यांच्या सामाजिक कार्यात सौ.शारदा बडोले नेहमी सोबत असतात. त्या उत्तम कवियत्री असून २०१८ साली त्यांच्या ‘भावसुमनांची ओंजळ' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.

Rajkumar Badole | राजकुमार बडोले ह्यांची पुस्तके