Home / Authors / Rajeshwari Kishor | राजेश्वरी किशोर
Rajeshwari Kishor | राजेश्वरी किशोर

जन्म : २७ एप्रिल १९६७, कराड

शिक्षण : बीएस्सी, इलेक्ट्रॉनिक्स

* नोकरी : औद्योगिक प्रशिक्षणसंस्थेत अध्यापक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणजोडणी व दुरुस्तीचे काम. (सन १९८७ ते १९९३)

* पतीच्या बदलीच्या नोकरीमुळे भारतातील अनेक राज्यांत वास्तव्याच्या काळात आलेले असामान्य अनुभव, विविध ठिकाणांच्या चालीरिती, बदलता निसर्ग, व्यक्तिचित्रण यांवर वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके आणि rajeshwarikishor.blogspot.com या ठिकाणी लिखाण.

* बदली होईल त्या ठिकाणी दिव्यांग मुलांसाठी कार्य आणि नैराश्यग्रस्त पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे समुपदेशन. मुख्यत: सामाजिक जागरूकता निर्माण होण्यासाठी लेखन.

* `कुसुमामृत' - मार्च २०२१ - कुसुमाग्रजांच्या साहित्याचा रसास्वाद या ebook चे संपादन.

* `अजेय' संस्थेच्या `शब्दझपूर्झा' या वार्षिक अंकाचे संपादन.

* `महाराष्ट्र शासन मराठी भाषा विकास' आणि `मिती क्रिएशन्स' आयोजित, `जागर मराठीचा' या मराठी भाषेची महती सांगणा‍र्‍या अद्वितीय कार्यक्रमात `प्रवासवर्णन-साहित्य प्रकार' या विषयावरील चर्चासत्रात २०२० आणि २०२१ असा दोन वर्षं सहभाग.

* सातारा आकाशवाणीवर मुलाखत आणि इतर लेखांचे अभिवाचन.

Rajeshwari Kishor | राजेश्वरी किशोर ह्यांची पुस्तके