Home / Authors / Padmaja Phatak | Madhav Nerurkar
Padmaja Phatak | Madhav Nerurkar

पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर १९४२; - ६ डिसेंबर २०१४) या एक मराठी लेखिका होत्या. त्या मराठीच्या एम.ए. होत्या. इ.स. १९६४ सालापासून फाटक स्त्री आणि वाङ्मयशोभा, इत्यादी नियतकालिकांमधून लेखन करीत. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

* फाटक यांचा दूरदर्शनवरील सुंदर माझं घर आणि शरदाचं चांदणं’ या कार्यक्रमांत सहभाग होता. त्या कार्यक्रमांत त्या निवेदिका असत.

* मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका अशा शब्दांत नंदा खरे यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्ट्य सांगितले होते. स्त्री मासिकासाठी पुरुषांच्या फॅशन्स या विषयावर एकदा त्यांनी लिहिले होते.

*** साहित्यातील योगदान
* हसरी किडनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी कंसात मजेत हे स्वतःचे टोपणनाव दिले आहे.

*** पुस्तके
* आवजो (प्रवासवर्णन)
* गर्भश्रीमंतीचे झाड
* चमंगख चष्टीगो (बालसाहित्य)
* चिमुकली चांदणी (बालसाहित्य)
* दिवेलागणी
* पैशाचे झाड
* बापलेकी (संपादित आत्मकथने, अन्य संपादिका - दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस)
* बाराला दहा कमी (विज्ञानकथा, सहलेखक - माधव नेरूरकर) : या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७चा पुरस्कार मिळाला आहे.
* माणूस माझी जात
* रत्‍नांचे झाड (अप्रकाशित)
* राही
* शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
* सोनेलुमियरे
* सोव्हेनियर (अमेरिकन जीवनावरील लेख)
* हॅपी नेटवर्क टु यू (अमेरिकन जीवनावरील लेख)
* हरविलेली दुनिया
* हसरी किडनी अर्थात "अठरा अक्षौहिणी” (आत्मकथन)
* हिंद विजय सोसायटीचे पगडी आजोबा

*** पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचे ५ पुरस्कार, इतर अनेक पारितोषिके, शिष्यवृत्ती, सन्मान, मानद नेमणुका इत्यादी


माधव नेरूरकर :

Padmaja Phatak | Madhav Nerurkar ह्यांची पुस्तके