Home / Authors / P. Vitthal | पी. विठ्ठल
P. Vitthal | पी. विठ्ठल
P. Vitthal | पी. विठ्ठल

डॉ. पी. विठ्ठल (१९७५) हे नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आणि संशोधन–मार्गदर्शक असून नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी आणि समीक्षक आहेत. त्यांचे
‘माझ्या वर्तमानाची नोंद’ , ‘शून्य एक मी’ आणि ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘मराठी कविता:
समकालीन परिदृश्य’ ,जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता’ ही समीक्षेची पुस्तके आणि ‘करुणेचा अंत:स्वर’ , ‘संदर्भ: मराठी भाषा’ , ‘समन्वयाचे क्षेत्र’ , ‘वर्तमानाचा उच्चार’ , ‘विश्लेषण’ हे लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.
याशिवाय ‘वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध’ , ‘विशाखा : एक परिशीलन’ , ‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ , ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ , ‘शिक्षणवेध’ , ‘वैचारिक साहित्य’ इ. संपादने प्रसिद्ध आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘माहितीपर लेखन’ या अभ्यासपत्रिकेचेही त्यांनी लेखन केले आहे.

साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक सन्मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत त्यांच्या काही निवडक कवितांचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे आणि शासन व्यवहार समितीचे ते सदस्य असून विविध विद्यापीठाच्या व स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासमंडळाचेदेखील ते सदस्य आहेत. मराठीतील सर्वच महत्त्वाच्या नियतकालिकांतून त्यांनी लेखन
केले आहे.

डॉ. पी. विठ्ठल
संपर्क : डॉ. पी. विठ्ठल,
प्राध्यापक, भाषा संकुल,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड ४३१६०६
मो. ९८५०२४१३३२

P. Vitthal | पी. विठ्ठल ह्यांची पुस्तके