Home / Authors / Neha Limaye | नेहा लिमये
Neha Limaye | नेहा लिमये

कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. गेली वीस वर्षे कंपनी सेक्रेटरी सेवाक्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत. कंपनी कायदा, सेबी रेग्युलेशन, फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (फेमा) हे अभ्यासाचे विषय.

• सी.एस.च्या व्यवसायात व्यग्र असूनही त्यांनी मराठी भाषेची तसेच संगीताची आवड जोपासली आहे. त्या संगीतविशारद असून त्यांच्या आई सौ. सुनंदा बेलापुरे या शाध्Eाीय संगीतगायिका आणि संगीतशिक्षिका होत्या. विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे-देशपांडे, विदुषी सावनी शेंडे यासारख्या प्रथितयश,

* संवेदनशील गायिका तसेच शास्त्रीय संगीतसाधक, रसिक आणि अभ्यासक यांचा सहवास. विविध मैफिली, रियाज, आईला कार्यक्रमात केलेली साथ यांचा अनुभव लहानपणापासूनच मिळाल्यामुळे त्यांचा शास्त्रीय संगीताकडे ओढा वाढला आणि `गाणं समजून घेऊन ऐकणं, म्हणजे काय’ याचे धडे आपसूकच मिळत गेले. यातूनच आधी ‘अनुनाद’ आणि आता `शब्द सूर जपून ठेव’ आकाराला येत गेले.

• `अवकाशातले गाणे : केसरबाई केरकर’ (मराठी अनुवाद) प्रथम बुक्सकडून लहान मुलांसाठी प्रकाशित.
• `शिक्षणविवेक', `छात्र प्रबोधन', `मनशक्ति' या मासिकांमधून लहान मुलांसाठी मराठी भाषेतल्या गंमती सांगणारे सदर लेखन.
• ‘मराठी भाषा’ या शब्द-व्युत्पत्तीवर आधारित फेसबुक आणि इतर वेबपोर्टलवरील ब्लॉगसाठी लेखन.
• महाराष्ट्र टाइम्स - `संवाद' पुरवणीत `शब्दांचिये गुंती’ सदरलेखन.
• `लिहू या बिनचूक मराठी’ सहलेखक श्रीपाद ब्रह्मे.
• रेगटेक टाइम्स, सकाळ-मनी अशा विविध वेब पोर्टल / नियतकालिकांमधून कंपनी कायदा तसेच अर्थविषयक घडामोडी याची मराठीतून सोपी, सुटसुटीत माहिती देणारे स्फुटलेखन.

Neha Limaye | नेहा लिमये ह्यांची पुस्तके