Home / Authors / mangala Narlikar | मंगला नारळीकर
mangala Narlikar | मंगला नारळीकर
mangala Narlikar | मंगला नारळीकर

डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (जन्म १७ मे १९४३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.

मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले

इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.

इ.स. १९६७ ते १९६९ : केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.

मुंबई विद्यापीठात व नंतर पुणे विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले.[ संदर्भ हवा ]
इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल येथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.[३][४] संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.

इ.स. १९८२ ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले. याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

इ.स. १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले.

इ.स. २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.

सद्‌ आणि सदसत्‌ विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.[१]
त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.

A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर)[७]
An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
गणितगप्पा (भाग १, २)
गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)[८]
नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर) : (खगोलविज्ञानविषक)[९][१०]
पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)
Fun and fundamentals of mathematics, Universities press