Home / Authors / मूळ लेखक - श्रेयस भावे, अनुवाद - अनघा नाटेकर | Author - Shreyas Bhave, Translator - Anagha Natekar
मूळ लेखक - श्रेयस भावे, अनुवाद - अनघा नाटेकर | Author - Shreyas Bhave, Translator - Anagha Natekar

श्रेयस भावे :-

* ‘विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’, नागपूरचे विद्युत अभियंता श्रेयस भावे हे रेल्वे विद्युतीकरणावरील भारतातील सर्वांत तरुण तज्ज्ञांपैकी एक आहेत. ते ‘अवर फर्स्ट मिलियन’ येथे उद्योजकीय यूट्यूब चॅनेलदेखील चालवतात. इतिहासाबद्दल अखंड प्रेम असलेल्या श्रेयसला प्रथम अशोकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या सभोवतालच्या समृद्ध इतिहासाने ललित लेखनाचे आव्हान स्वीकारण्यास प्रेरित केले. ही ‘कादंबरी त्रिधारा’ मुळात इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झाली आणि मुंबईतील एका नामांकित प्रॉडक्शन कंपनीने स्क्रीनसाठी विकत घेतली.

* नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामधल्या गूढतेवर आधारित ‘प्रिझनर ऑफ याकुत्स्क’ हे त्यांचे पुस्तक २०१९ मध्ये प्रकाशित झाले. ‘रेडर्स ऑफ सुरत’ हे त्यांचे आगामी पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे महान गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या रोमांचकारी साहसांवर आधारित त्रयीतील पहिले पुस्तक आहे.
श्रेयसच्या पुस्तकांचे अनुवाद मल्याळम (मातृभूमी समूह) आणि मराठीमध्ये (राजहंस प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन) करण्यात आले आहेत.

* लेखनाव्यतिरिक्त श्रेयसला गीतलेखन, संगीतरचना, स्केचिंग आणि वॉटर कलर पेंटिंगची आवड आहे. तो गिटार वाजवतो आणि महाराष्ट्रातील अनेक डोंगरी किल्ल्यांवर गिर्यारोहणाचा आनंद घेतो. तो PADI प्रमाणित ओपन वॉटर डायव्हर आहे आणि त्याला पाण्याखालील जग धुंडाळायला आवडते.

श्रेयस हा संगीतकारदेखील आहे आणि त्याच्या ‘श्रेयस अँड द स्किनर्स' या बँडने २०२१ मध्ये ‘फ्लक्स' नावाचा त्यांचा पहिला संगीत अल्बम प्रकाशित केला.

* श्रेयस भावे हे ‘विश्वास पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि.’चे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) देखील आहेत. ही कंपनी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर्स आणि रेल्वे विद्युतीकरणाशी संबंधित आहे. तिची वार्षिक उलाढाल ७० लक्ष डॉलर्सच्या घरात आहे.

* श्रेयस म्हणतो, ‘पुस्तकं लिहिणं म्हणजे हॉरक्रक्स तयार करण्यासारखं आहे. तुम्ही लिहिता त्या पुस्तकांमध्ये तुम्ही तुमच्या आत्म्याचा चांगला भाग सोडता!'

अनघा नाटेकर :-
अनघा नाटेकर सध्या ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज् अँड अ‍ॅग्रिकल्चर’, पुणे येथे भाषातज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करतात. गेल्या २० वर्षांपासून त्या इंग्लिश आणि जर्मन भाषांच्या प्राध्यापक म्हणून काम
करीत आहेत. त्यांपैकी १५ वर्षे त्यांनी ‘इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिंबायोसिस’ (एल्टिस) व ‘सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरिन अँड इंडियन लँग्वेजेस’ (सिफिल) येथे प्राध्यापक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रशिक्षणक्रमांच्या समन्वयक म्हणून काम केले आहे. एम.ए. इंग्लिश व जर्मन भाषेतील पदव्युत्तर पदविका अशी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आहे.

* त्याखेरीज अनुवाद विषयातील पदविकाही त्यांनी ‘मॅक्समुलर भवन’मधून आणि जर्मन भाषेतील अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा ‘पुणे विद्यापीठा’तून संपादन केला. ‘केंब्रिज विद्यापीठा’च्या बिझनेस इंग्लिश परीक्षा आणि शिक्षक प्रशिक्षण परीक्षा त्या उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. तसेच त्या केंब्रिज विद्यापीठाच्या
बिझनेस इंग्लिश सर्टिफिकेट परीक्षांकरिता मान्यताप्राप्त परीक्षक आणि प्रशिक्षक आहेत.
* औद्योगिक कर्मचार्‍यांना त्यांच्या व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन त्यांनी भाषेचे ज्ञान दिले आहे. बिझनेस कम्युनिकेशनमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. ‘मर्सिडीज बेन्झ’, ‘फोक्सवागन’, ‘पर्सिस्टंट’, ‘एशियन पेंट्स’ अशा अनेक नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी इंग्लिश, मराठी व जर्मन शिकवले आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षणक्रमांचे नियोजन करणे याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. तीन वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने इंग्लिश शिकवले. सध्याही त्या इंग्लिश व जर्मनचे ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. कोणतीही भाषा व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून आणि वर्गात विविध उपक्रम प्रत्यक्ष करून घेऊन रंजक पद्धतीने शिकवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी अनेक लघुकथा व बालसाहित्याचा अनुवाद यापूर्वी केलेला आहे.

मूळ लेखक - श्रेयस भावे, अनुवाद - अनघा नाटेकर | Author - Shreyas Bhave, Translator - Anagha Natekar ह्यांची पुस्तके