Home / Authors / Madhav Karve | माधव कर्वे
Madhav Karve | माधव कर्वे

माधव कर्वे यांचं इंग्लिश साहित्याचं पदवी पर्यंतच शिक्षण आणि पुढे मराठी भाषेतल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर दै . सकाळ, केसरी आणि इतरत्र कथांपासून पुस्तक परिचयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाने शुभारंभ झाला.

* पुढे स्वतः पत्रकार म्हणून काम करताना दुसरीकडे अपंगांच्या क्षेत्रातले अपंग पुनर्वसन तज्ज्ञ डॉ. वा. ना. तुंगार ह्यांच्या अपंग साहाय्यकारी संस्थेच्या अपंगवार्ता या त्रैमासिकाचं दीर्घकाळ संपादन केलं. दरम्यान बंगाली भाषेची ओळख झाल्यानंतर बंगाली साहित्यातील कथांचे अनुवाद प्रसिद्ध झाले.

* इंग्लिश साहित्यातल्या ओ हेन्री पासून अर्नेस्ट हेमिंग्वे सारख्या कथाकारांच्या कथांचे अनुवादही प्रसिद्ध होत राहिले.

* ह्याचवेळी दुसरीकडे मेहता पब्लिशिंग हाऊससाठी डिस्क्लोजर (मायकेल क्रिश्टन ), द क्लायंट (जॉन ग्रिशॅम ), गोल्डफिंगर (इयान फ्लेमिंग ), सेव्हिंग फेथ (डेव्हिड बलडासी ) इ. बेस्टसेलर कादंबऱ्यांचे आणि अन्य काही पुस्तकांचे अनुवाद केले.

* आत्तापर्यंत अन्य प्रकाशकांनी सिडने शेल्डन आणि डेव्हिड बलडासी ह्या नामवंत बेस्टलेखकांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादाबरोबरच अपंगांचं स्फूर्तिस्थान असलेल्या हेलन केलर ह्यांच्या द स्टोरी ऑफ माय लाईफ ह्या आत्मकथनाचा अनुवाद अशी पुस्तक प्रसिद्ध केली आहेत.

* ह्याशिवाय अपंगांच्या प्रश्नासंबंधी आत्त्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखनामध्ये डॉ. वा. ना. तुंगार ह्यांचं आत्मचरित्र (कहाणी अथक जिद्दीची ) तसंच राजेंद्र खंडेलवाल ह्यांनी अपंग बांधवाना प्रेरित करण्याच्या हेतूने स्कूटर वरून केलेल्या खारदूंगला साहस सफारीसंबंधित गरुडभरारी ह्या पुस्तकांच्या शब्दांकनाचा समावेश होतो.

Madhav Karve | माधव कर्वे ह्यांची पुस्तके