Home / Authors / Madhav Godbole | माधव गोडबोले
Madhav Godbole | माधव गोडबोले
Madhav Godbole | माधव गोडबोले

माधव गोडबोले (जन्म १५ ऑगस्ट १९३६) यांनी केंद्र सरकारचे गृह व न्यायसचिव असताना मार्च १९९३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

त्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू सचिव, नगर विकास सचिव आणि महाराष्ट्र सरकारचे प्रधान वित्त सचिव, तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष ही पदेही भूषवली होती.
आशियाई विकास बँकेत त्यांनी ५ वर्षे काम केले.

डॉ. गोडबोले यांनी आतापर्यंत, सार्वजनिक जीवन व धोरणांसंबंधी २० पुस्तके लिहिली असून त्यांपैकी १२ इंग्रजी व ८ मराठी आहेत. त्यांच्या
`सेक्युलॅरिझम : इंडिया अ‍ॅट अ क्रॉसरोड्स' (२०१६) या पुस्तकाचा मराठी अनुवाद सप्टेंबर २०१७ मध्ये प्रकाशित झाला, तर हिंदी अनुवाद २०१८ मध्ये अपेक्षित आहे.
इंदिरा गांधी यांच्यावरील इंग्रजी पुस्तक त्यांनी नुकतेच हातावेगळे केले आहे. ते लवकरच प्रसिद्ध होईल.

त्यांचे इंग्रजी व मराठी लेख अनेक संग्रहांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांचे ४०० हून अधिक लेख अनेक वृत्तपत्रांत व नियतकालिकांत प्रसिद्ध झालेआहेत. ‘लोकसत्ता’ या दैनिकात २ वर्षे ते साप्ताहिक सदर लिहीत असत. त्यांच्या मराठी पुस्तकांना वैचारिक लिखाणाबाबतचे सहा पुरस्कार मिळाले आहेत.

एन्रॉन वीज प्रकल्प, सुशासन, तसेच भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे व्यवस्थापन अशासारख्या अनेक महत्त्वाच्या सरकारी समित्यांचे ते अध्यक्ष होते.

त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम. ए. व पीएच. डी. आणि अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाच्या अर्थशास्त्रात एम. ए. या पदव्या मिळवल्या आहेत.

डॉ. गोडबोले,यांचे १५ एप्रिल २०२२ रोजी निधन झाले.


डॉ. माधव गोडबोले यांची ग्रंथसंपदा
*** मराठी
१. जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन ; राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४.
२. लोकपालाची मोहिनी ; राजहंस प्रकाशन, पुणे, २०११.
३. सुशासन हे दिवास्वप्नच! ; श्रीविद्या प्रकाशन, पुणे, २००९.
४. सत्ता आणि शहाणपण ; श्रीविद्या प्रकाशन, पुणे, २००५.
५. नवी आव्हाने, कालबाह्य मानसिकता ; श्रीविद्या प्रकाशन, पुणे, २००३.
६. प्रशासनाचे पैलू - खंड २; श्रीविद्या प्रकाशन, पुणे, २०००.
७. प्रशासनाचे पैलू - खंड १; श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९९.
८. नव्या दिशा, बदलते संदर्भ ; श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९८.

*** इंग्रजी ग्रंथांची मराठी भाषांतरे
१. धर्मनिरपेक्षता - धोक्याच्या वळणावर ; राजहंस प्रकाशन, पुणे, २०१७.
२. हरवलेले सुशासन ; विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे, २०१५.
३. भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा ; राजहंस प्रकाशन, पुणे, २०१२.
४. फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा ; राजहंस प्रकाशन, पुणे, २००७.
५. अपुरा डाव ; देशमुख आणि कंपनी, पुणे, १९९८.

*** इंग्रजी
१. Secularism: India At A Crossroads, Rupa & Co., New Delhi, 2016.
2. The God who Failed- An Assessment of Jawaharlal Nehru's Leadership, Rupa & Co., New Delhi, 2014.
3. Good Governance: Never On India's Radar, Rupa & Co., New Delhi, 2014.
4. India's Parliamentary Democracy on Trial, Rupa & Co., New Delhi, 2011.
5. The Judiciary and Governance in India, Rupa & Co., New Delhi, 2008.
6. The Holocaust of Indian Partition : An Inquest, Rupa & Co., New Delhi, 2006.
7. Public Accountability and Transparency

Madhav Godbole | माधव गोडबोले ह्यांची पुस्तके