Home / Authors / Girish Karnad / Trans - Uma Kulkarni
Girish Karnad / Trans - Uma Kulkarni
Girish Karnad / Trans - Uma Kulkarni

गिरीश कर्नाड - कानडीत कार्नाड -- हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला.

*** शिक्षण
कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. कर्नाड त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले. गिरीश कार्नाड कर्नाटक आर्टस् महाविद्यालयातून गणित आणि संख्याशास्त्र या विषयातून बी.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यानंतर इंग्लंड येथे तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशात्रमध्ये पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. १९६२ मध्ये त्यांची ऑक्सफर्ड युनिअनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

*** गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
* कालिदास सन्मान पुरस्कार
* तन्वीर सन्मान पुरस्कार (२०१२)
* नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२)
* पद्मभूषण (१९९२)
* पद्मश्री (१९७४)
* भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल (१९८९)
* पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद (१९७४-७५)
’* वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२)
’* संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०)
* संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार (१९७२)
* साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४)
* होमी भाभा फेलोशिप (१९७०-७२)
* ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)
* राजोत्सव पुरस्कार


सौ. उमा विरुपाक्ष कुलकर्णी

जन्मतारीख: १ ऑक्टोबर १९५०

शिक्षण: एम.ए., पीएच.डी

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. माझं नाव भैरप्पा
२. खेळता खेळता आयुष्य

Girish Karnad / Trans - Uma Kulkarni ह्यांची पुस्तके