Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / Eknath Avhad | एकनाथ आव्हाड
Eknath Avhad | एकनाथ आव्हाड
Eknath Avhad | एकनाथ आव्हाड

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ३२ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत.

मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असे विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित. ४० पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या एकूण साहित्यावर समीक्षणात्मक ५ पुस्तकेदेखील प्रसिद्ध. काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांत आणि ब्रेल लिपीत अनुवाद प्रसिद्ध.

इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'चांदोबाच्या देशात' ही कविता, इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'बाबांचं पत्र' हा धडा तसेच इयत्ता पहिली बालभारतीच्या उर्दू माध्यमाच्या पुस्तकात 'शेतकरीदादा' ही कविता समाविष्ट. तसेच सीबीएससीच्या शाळांसाठी खाजगी स्वरूपात तयार करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांत कवितांचा समावेश. गोवा शासकीय इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'आमच्या बाई' या कवितेचा समावेश. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठात 'आनंदाची बाग' या बालकथासंग्रहाचा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर या विद्यापीठात 'छंद देई आनंद' हा बालकवितासंग्रहांचा एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट.
कथाकथनाचे एक हजाराहून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत

Eknath Avhad | एकनाथ आव्हाड ह्यांची पुस्तके