Home / Authors / Editor : A. P. Deshpande
Editor : A. P. Deshpande
Editor : A. P. Deshpande

डाॅ. अनंत पांडुरंग देशपांडे हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके व लेख लिहिणारे लेखक आहेत. २०१८मध्ये ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह झाले. * अ.पां. देशपांडे हे मुळात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे आणि मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून ३५ वर्षे नोकरी केली. * देशपांडे हे इ.स. १९७४पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे. * त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स' ही संस्था १९९७ साली स्थापन केली. ते त्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासूनचे अध्यक्ष आहेत. *** पुस्तके (लेखन व संपादन) * विज्ञानयात्री - डॉ अनिल काकोडकर (चरित्र, सहलेखक - डाॅ. श्रीराम मनोहर) * अभियांत्रिकीचे जग (संपादित) * आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण (अनेक खंड, प्रत्येक खंडाचे अनेक भाग). : खंड ३ (विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण), भाग १ - शिल्पकार चरित्रकोश (संपादित, सहसंपादक डाॅ बाळ फोंडके) * उपयोजित विज्ञान (संपादित) * कॅनडा (प्रवास वर्णन) * काडेपेटी आणि इतर विज्ञान खेळणी (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता) * घरगुती वापरातील १३० औषधी वनस्पती (माहितीपर) * टाकाऊतून शिकाऊ (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता) * द्रव्यगुण विज्ञान, भाग १, २ (मराठी, इंग्रजी, सहलेखक - डाॅ. सुभाष रानडे, वैद्य रवी रा.जवळगेकर)) * परिसर आणि स्वावलंबन (माहितीपर) * मराठी विज्ञान परिषद नाबाद ५१ (माहितीपर) * विज्ञानयात्री - डॉ. माधव गाडगीळ (चरित्र, व्यक्तिचित्रण) * विज्ञानयात्री - डॉ. माधव चितळे (चरित्र, व्यक्तिचित्रण) * मूलभूत विज्ञान (संपादित) * यंत्रमानव (संपादित कथासंग्रह, सहसंपादक - सुबोध जावडेकर) * डॉ. रघुनाथ माशेलकर : भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता (चरित्र, व्यक्तिचित्रण) * विज्ञानयात्री - डॉ. वसंत गोवारीकर (चरित्र, व्यक्तिचित्रण) * विद्वज्जन * विज्ञान व तंत्रज्ञानविषयक प्रगती * विज्ञानिनी भाग १, २; (संपादित, या संग्रहात एक लेख डाॅ. मेघश्री दळवी यांचा आहे. * शंभर वनस्पती शास्त्रज्ञ (संपादित) * शेतीतज्ज्ञ - डॉ. आ. भै. जोशी (चरित्र) * स्वरयज्ञ - सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची पन्नास वर्षे (संपादित) *** अ.पां देशपांडे यांनी लिहिलेल्या काही लेखांचे मथळे * ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक * भालचंद्र उदगावकर समाजभान असणारा वैज्ञानिक

Editor : A. P. Deshpande ह्यांची पुस्तके