Home / Authors / Dr.Arun Gadre | डॉ. अरुण गद्रे
Dr.Arun Gadre | डॉ. अरुण गद्रे
Dr.Arun Gadre | डॉ. अरुण गद्रे

डॉ. अरुण गद्रे (जन्म : ११ ऑक्टोबर, इ.स. १९५७[१]) हे एक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर असून मराठी लेखक आहेत. त्यांची चार पुरस्कारप्राप्त कादंबऱ्या धरून, एकूण ११हून अधिक मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

* त्याशिवाय, त्यांच्या नावावर सर्वसाधारण वाचकांसाठी लिहिलेली तीन आरोग्यविषयक पुस्तके आणि दोन पाठ्यपुस्तके आहेत. त्यांनी काही हिंदी पुस्तकेही लिहिली आहेत.

* मध्यम वर्गात जन्म घेतलेल्या अरुण गद्रे यांचे शालेय शिक्षण मुंबईतील एका नामवंत शाळेत झाले. एस्‌‍एस्‌‍सी परीक्षेत ते गुणवत्ता यादीत येऊन उत्तीर्ण झाले. त्याप्रसंगी रेडिओवर झालेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांनी डॉक्टर होऊन खेड्यात व्यवसाय करण्याची त्यांची मनीषा बोलून दाखविली होती.

* मुंबईतील ग्रॅन्ड मेडिकल कॉलेजातून अरुण गद्रे यांनी एम्‌बीबीएस केले. तेथेच महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाचे सभासद असल्याने त्यांना मराठी वाचनाची गोडी लागली. ते एकांकिका लिहू लागले, आणि त्यांचे सहकारी त्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये साभिनय सादर करू लागले. त्या पाहून प्रेक्षक बहुधा हुर्रे उडवीत, पण काही झाले तरी तो लक्षात राहण्यासारखा अनुभव होता.

* कॉलेजचे प्राध्यापक मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कामात ढवळाढवळ करीत नसत. त्यामुळे अरुण गद्रे यांचे ते आयुष्य सुखात गेले. जनरल सर्जरी हा विषय न मिळाल्यामुळे गद्रे यांना नाइलाजाने स्त्रीरोगचिकित्सा हा विषय घेऊन एम.डी. करावे लागले.

* एम.डी. झाल्यावर गद्रे यांनी बाबा आमटे यांच्या सल्ल्याने दुष्काळी भागातील एका लहान खेड्यात आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांच्या पत्‍नी डॉ. ज्योती गद्रे या भूलतज्ज्ञ असून, पुण्यात व्यवसाय करतात.

* डॉ. अरुण गद्रे वृत्तपत्रांतून वैचारिक व अन्य लेखनही करतात. त्यांचा पुण्याच्या दैनिक सकाळच्या ’सप्तरंग’ या पुरवणीत 'डॉक्‍टरांनो, याही बाजू तपासा' हा लेख १० जून २०१२ला प्रकाशित झाला.

* १७जून २०१२ च्या ’सप्तरंग’मध्ये डॉ गद्रे यांचा ’साबणासारखी विकली जातेय आरोग्यसेवा!’ हा आणखी एक अनुभवसिद्ध लेख प्रकाशित झाला, तोही वाचकानी वाखाणला. त्यावर महाराष्ट्रभरातून शेकडो प्रतिसाद आले.

*** डॉ अरुण गद्रे यांनी लिहिलेली पुस्तके
* असे होते विल्यम कॅरी (चरित्र)
* आधुनिक लग्नकुंडली (सहलेखिका वंदना कुलकर्णी)
* एक होता फेंगाड्या (कादंबरी) : या कादंबरीचा लीना मेहेंदळे यांनी ‘एक था फेंगाड्या’ नावाचा हिंदी अनुवाद केला आहे. या अनुवादाला २००७ साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.(?).
* किनवटचे दिवस (अनुभवाधारित आत्मकथन)
* गुड न्यूझ आहे अर्थात मातृत्व उपनिषद (आरोग्यविषयक)
* घातचक्र (कादंबरी)
* तिची ओवी (ललित लेखन)
* भावपेशी (आरोग्यविषयक)
* वधस्तंभ (आत्मकथनात्मक कादंबरी) (हिंदीत सुद्धा याच नावाने)
* विषाणू (कादंबरी)
* वेडी सुमिता (कादंबरी)
* सूडाकडून करुणेकडे (अनुवादित आत्मचरित्र. मूळ लेखक डीन मेरिल व तास साडा)
* हितगुज तरुण-तरुणींशी (मार्गदर्शनपर, सहलेखिका डॉ. ज्योती गद्रे)
* हितगुज लेकीशी वयात येताना (मार्गदर्शनपर)

*** पुरस्कार
* ’एक होता फेंगाड्या’ला १९९५ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार
* ‘एक था फेंगाड्या’ या लीना मेहेंदळे यांनी केलेल्या हिंदी अनुवादाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला(?) (२००७)
* ’घातचक्र’ या कादंबरीला ह.ना.आपटे पुरस्कार आणि वि.स.खांडेकर पुरस्कार
* ’भावपेशी’ या माहितीपर पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा म.भि. चिटणीस पुरस्कार
त्याच पुस्तकाला १९९५ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा द.श्री. शेणोलीकर पुरस्कार
* ’वधस्तंभ’ला विखे पाटील पुरस्कार

Dr.Arun Gadre | डॉ. अरुण गद्रे ह्यांची पुस्तके