Home / Authors / Dr. Yashwant Pathak
Dr. Yashwant Pathak

प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक होते.

* ते मराठी व संस्कृतमध्ये एम.ए. असून त्यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठातून १९७८मध्ये पीएच्‌.ड़ी. मिळवली होती. त्यांचा हा प्रबंध 'नाचू कीर्तनाचे रंगी' या नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाला.

* यशवंत पाठक हे मनमाडच्या येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे प्राध्यापक होते.

*** डाॅ.यशवंत पाठक यांनी लिहिलेली पुस्तके
* अंगणातले आभाळ (आत्मकथन) - ग्रंथाली प्रकाशन
* अंतरीचे धावे (धार्मिक) - ग्रंथाली प्रकाशन
* आनंदाचे आवार (लेखसंग्रह) - ग्रंथाली प्रकाशन
* कीर्तन प्रयोग (चर्चासत्रांमध्ये सादर झालेले विविध कीर्तनप्रकारांवरचे निबंध) - गोदावरी प्रकाशन, अहमदनगर
* कैवल्याची यात्रा (धार्मिक - ज्ञानेश्वरांचा आणि विवेकानंदांचा ज्ञानयज्ञ, तुलना) - ग्रंथाली प्रकाशन
* Gandhi and the World (सहलेखक - देवीदत्त अरविंद महापात्रा)
* चंदनाची पाखर (कथासंग्रह) - ग्रंथाली प्रकाशन
* चंद्राचा एकांत (ललित लेख) - ग्रंथाली प्रकाशन
* नाचू कीर्तनाचे रंगी (मराठी किर्तनावरील प्रबंध) - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
* निरंजनाचे माहेर (धार्मिक) मुक्ताई, जनाई, वेणाई काव्य समीक्षा - त्रिदल प्रकाशन
* पहाटसरी (ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचने) - ग्रंथाली प्रकाशन
* ब्रह्मगिरीची सावली (कादंबरी) मौज प्रकाशन गृह
* Meanings of Old Age and Aging in the Tradition of India (सहलेखक - डाॅ. श्रीनिवास टिळक)
* मोहर मैत्रीचा (ललित लेखसंग्रह) -मॅजेस्टिक प्रकाशन
* येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ (सोनोपंत दांडेकरांचे चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान)
* संचिताची कोजागिरी (कादंबरी) - ग्रंथाली प्रकाशन
* आभाळाचं अनुष्ठान - कथासंग्रह - ग्रंथाली प्रकाशन
* मनाच्या श्लोकांचे मर्म - मनाच्या श्लोकांचा अर्थ - राजहंस प्रकाशन

*** प्रा. यशवंत पाठक यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
* चतुरंग पुरस्कार
* डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार

***महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार
* (अंगणातले आभाळ (आत्मकथन),
* नाचू कीर्तनाचे रंगी,
* निरंजनाचे माहेर आणि येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ या पुस्तकांना) संत विष्णूदास कवी पुरस्कार

* जळगाव येथे १७ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या १०व्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

* यशवंत पाठक हे विदर्भातल्या अकोला शहरात इ.स. १८६४ साली सुरू झालेल्या नामांकित अश्या बाबुजी देशमुख व्याख्यानमालेचे एक व्याख्याते होते.
* डाॅ.यशवंत पाठक हे कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कार निवड समितीचे सदस्य होते.

*** संत ज्ञानदेव पुरस्कार

* नाशिक येथे १५ ते १७ मार्च २०१३ या काळात भरलेल्या २५व्या रौप्य महोत्सवी सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

Dr. Yashwant Pathak ह्यांची पुस्तके