Home / Authors / Dr. Uday Nirgudkar | डॉ. उदय निरगुडकर
Dr. Uday Nirgudkar | डॉ. उदय निरगुडकर
Dr. Uday Nirgudkar | डॉ. उदय निरगुडकर

पुणे विद्यापीठातून एम.बी.ए.
* पुणे विद्यापीठाने `मार्केटिंग मॅनेजमेंट' या विषयात डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली.
* दोन दशकांहून अधिक काळ आय.टी., शैक्षणिक क्षेत्र, पायाभूत सुविधा,
पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात कामाचा दांडगा अनुभव. अग्रगण्य आयटी कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रमुख पदावर.
* ५० हून अधिक देशांत शैक्षणिक क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापनकौशल्य यांतील विविध विषयांवर व्याख्याने.
* Strategic use of IT, TQM, Business Process Reengineering या विषयांवरील ४ पुस्तकांचे संकलन.
* `लोकल ते ग्लोबल' जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा आणि All about winning Indian Elections या पुस्तकांचे, तसेच C.E.O. या कादंबरीचे लेखन.
* पत्रकारितेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक नवे उपक्रम सुरू केले. सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभक्तीचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळेच `धागा शौर्य का, राखी अभिमान की' आणि सैनिकांच्या कुटुंबांबरोबर दिवाळी साजरी करत `आपला सैनिक, आपली दिवाळी' हे उपक्रम सुरू केले. अनेकदा सीमेवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला.
पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम चॅनलवरून लोकप्रिय बनवले.
* झी २४ तास, `न्यूज१८ लोकमत' या वृत्तवाहिन्यांचे व DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून यशस्वी कारकीर्द.
* सध्या देश-विदेशातील विद्यापीठे, संशोधन संस्थांमध्ये कार्यरत.
NHPC ह्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात स्वतंत्र संचालक.

Dr. Uday Nirgudkar | डॉ. उदय निरगुडकर ह्यांची पुस्तके