Home / Authors / Dr. Narendra Dabholkar , Madhav Bavge
Dr. Narendra Dabholkar , Madhav Bavge

जन्म : १ नोव्हेंबर १९४५

शिक्षण : एम. बी. बी. एस.

* १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते

* १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना, तेव्हापासून २० ऑगस्ट २०१३ पर्यंत कार्याध्यक्ष.

* महाराष्ट्र अं.नि. स . १८० शाखांव्दारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत कार्यरत.

* अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध पैलूंवर बारा पुस्तके. प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्या. अनेक पुस्तकांना पुरस्कार.

* प्रथितयश वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन. आकाशवाणी, इलेक्ट्रोनिक्स chanels यांव्दारे अनेक कार्यक्रम. हजारो व्याख्याने.

* बुवाबाजी, भानामती, चमत्कार, भविष्य, अनिष्ट रूढी-परंपरा अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाच्या विरोधात अथक संघर्ष.

* वैज्ञनिक दृष्टीकोन व विवेकवाद रुजविणे यासाठी रचनात्मक कार्य.

* 'साधना' या साने गुरूजींनी स्थापना केलेल्या साप्ताहिकाचे सन २००० सालापासून संपादक.

* दशकातला सर्वोत्तम कार्यकर्ता' म्हणून २००६ साली महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्यातर्फे न्यू जर्सी येथे १० लाखांचा पुरस्कार. ही सर्व रक्कम 'अंनिस' ला प्रदानमाधव बावगे
रजिस्ट्रार , राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.

* १९७५ पासून श्रमर्षी बाबा आमटे यांच्या प्रकल्पाशी निगडीत. श्रमसंस्कार छावणी शिबिर समन्वयक, स्वरानंदनवन कार्यक्रमाचे नियोजन, ईटानगर (अरुणाचल) ते ओखा (गुजरात) 'भारत जोडो' अभियानात सायकल प्रवास.
विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्र सेवा दल व छात्र भारतीच्या चळवळीतून जडणघडण.

* १९९३ पासून 'महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन' (अंनिस ) समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. सध्या अंनिस, राज्य सरचिटणीस या पदावर कार्यरत.

* शिक्षकांच्या सहकार्याने, वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर ६१ शिबिरांचे आयोजन. ग्रामीण विद्यार्थ्यासाठी 'विज्ञान बोध वाहिनी', 'फिरते नभांगण' या उपक्रमांचे आयोजन.

* करणी, भानामती, भूतबाधा, अंगात येणे, बुवाबाजी, चमत्कार, फल ज्योतिष, कालबाह्य अघोरी प्रथा या विरोधात सक्रीय कार्य. १४०० हून अधिक सप्रयोग व्याख्याने.

* अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिक मासिक यातून लेखन, ६३ बुवांचा भांडाफोड.

* १८० हून अधिक भानामती प्रकरणे सोडवली, ३ नरबळी प्रकरणे थांबवली, ५ ठिकाणच्या पशुहत्या रोखल्या, १२ पोतराजांना पोतराज प्रथेतून मुक्त केले.

*** पुरस्कार :
* भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार.
* अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनचा सामाजिक प्रबोधन पुरस्कार.
* सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉ. राम आमटे प्रबोधन पुरस्कार.
* आंतरभारतीचा यदुनाथ थत्ते पुरस्कार.
* शिवधत्रपती शिक्षण संस्थेचा (लातूर) शाहू भूषण पुरस्कार.
* प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार.
* लातूर भूषण पुरस्कार.

Dr. Narendra Dabholkar , Madhav Bavge ह्यांची पुस्तके