Home / Authors / Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर
Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर
Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर

जन्म : १ नोव्हेंबर १९४५

शिक्षण : एम. बी. बी. एस.

* १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते

* १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना, तेव्हापासून २० ऑगस्ट २०१३ पर्यंत कार्याध्यक्ष.

* महाराष्ट्र अं.नि. स . १८० शाखांव्दारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत कार्यरत.

* अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध पैलूंवर बारा पुस्तके. प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्या. अनेक पुस्तकांना पुरस्कार.

* प्रथितयश वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन. आकाशवाणी, इलेक्ट्रोनिक्स chanels यांव्दारे अनेक कार्यक्रम. हजारो व्याख्याने.

* बुवाबाजी, भानामती, चमत्कार, भविष्य, अनिष्ट रूढी-परंपरा अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाच्या विरोधात अथक संघर्ष.

* वैज्ञनिक दृष्टीकोन व विवेकवाद रुजविणे यासाठी रचनात्मक कार्य.

* 'साधना' या साने गुरूजींनी स्थापना केलेल्या साप्ताहिकाचे सन २००० सालापासून संपादक.

* दशकातला सर्वोत्तम कार्यकर्ता' म्हणून २००६ साली महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्यातर्फे न्यू जर्सी येथे १० लाखांचा पुरस्कार. ही सर्व रक्कम 'अंनिस' ला प्रदान

Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांची पुस्तके