Home / Authors / Dr. Hamid Dabholkar | डॉ. हमीद दाभोलकर
Dr. Hamid Dabholkar | डॉ. हमीद दाभोलकर
Dr. Hamid Dabholkar | डॉ. हमीद दाभोलकर

एमबीबीएस, डीएनबी (मनोविकारशास्त्र)
* `परिवर्तन' ह्या संस्थेमध्ये संचालक-मनोविकारतज्ज्ञ म्हणून गेली पंधरा वर्षे कार्यरत.
* `मानसरंग' या मानसिक आरोग्य संवादासाठी कलेचा वापर करणार्‍या अभिनव, प्रबोधन आणि उपचारपद्धतीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा सहभाग.
* मानसिक आरोग्य प्रबोधन आणि प्रशिक्षण यासाठी दहापेक्षा अधिक लघुपटांची निर्मिती.
*`मानसमैत्री' या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवकांचे भावनिक प्रथमोपचार याविषयी प्रशिक्षण.
* `किमया कॅफे' : तीव्र मानसिक आजाराशी झुंजणार्‍या रुग्ण आणि नातेवाईक यांनी चालवलेल्या कॅफेची निर्मिती. पुणे आणि तेजपूर येथे असे कॅफे चालवले जातात.
* THRIVE या उपक्रमाच्या अंतर्गत स्किझोफ्रेनियासारख्या तीव्र मानसिक आजार असलेल्या दोनशेपेक्षा अधिक रुग्णांना अर्थपूर्ण रोजगाराची उपलब्धी.
* ‘स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त व्यक्तींचे समाजाभिमुख पुनर्वसन’ याविषयी `लॅन्सेट' या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधाचे सहलेखक. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध.
* सैलानी बाबा दर्गा (बुलढाणा) येथील मनोरुग्णांना आधुनिक मानसिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी `दवा-दुवा प्रकल्पा'मार्फत कार्यरत.
* डिप्रेशन, चिंता आणि दारूचे व्यसन या मानसिक आजारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर उपचार उपलब्ध करून देणार्‍या पथदर्शी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी.
* सातारा (महाराष्ट्र), तेजपूर (आसाम) आणि इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथील व्यसनमुक्ती केंद्रांतून आज अखेर पंधरा हजारान्पेक्षा अधिक लोकांना दारू आणि अफूच्या व्यसनमुक्तीच्या सुविधा देणार्‍या केंद्रांचे मुख्य समन्वयक.
* `महाराष्ट्र अंनिस'मार्फत भारतातील पहिल्या करणी भानामती उपचार केंद्राची स्थापना.
* महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका लीड महाविद्यालयात युवकांच्या मानसिक आरोग्यविषयक कार्यरत असलेल्या `युवा मानसरंग' या पथदर्शी प्रकल्पाचा समन्वय.
* `महाराष्ट्र अंनिस'चे राज्यकार्यकारी समिती सदस्य.
* `साधना ट्रस्ट'चे विश्वस्त.
* डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत `प्रश्न मनाचे' या पुस्तकाचे लेखन.
* `विवेकाच्या वाटेवर' या पुस्तकाला राज्यशासनाचा पुरस्कार.

Dr. Hamid Dabholkar | डॉ. हमीद दाभोलकर ह्यांची पुस्तके