Home / Authors / Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

दिलीप प्रभावळकर हे एक भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत.

झपाटललेला या मराठी चित्रपटातील 'तात्या विंचू' आणि 'चौकट राजा' आणि 'एक डाव भुताचा' या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली. मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी 'आबा गंगाधर टिपरे ' म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव -गुंड्याभाऊ यांच्या 'चिमणीव' मराठी रंगभूमीवरील, 'हसवा फसवी' आणि 'वासूची सासू' मधील त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या.

प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. तेलगू रिमेक, शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधींची भूमिका त्यांनीच केली. याशिवाय, प्रभावळकर यांनी अनेक नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली.

पुस्तके प्रकाशित
* अनुदिनी
* अवतीभवती
* आवाज दिलीप प्रभावळकरांचा
* एका खेळियाने
* कागदी बाण
* गुगली
* चूकभूल द्यावी घ्यावी
* झूम
* दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका, भाग १ (ॲक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो),
भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना),
भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण).
* नवी गुगली
* बोक्या सातबंडे भाग १ ते १०
* हसगत
* हसवा फसवी (हे नाट्य आता पुष्कर श्रोत्री, सतीश जोशी व योगिनी पोफळे सादर करतात. २००वा प्रयोग १०-७-२०१६ला झाला)
* हाउज दॅट!
* अनपेक्षित
* मी असा (कसा) झालो
* माझ्या धम्माल गोष्टी

पुरस्कार :-
* आशियाई चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार (३०-१-२०१८)
* गंधार पुरस्कार (१५-११-२०१८)
* गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक
* नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार
* नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार
* पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)
* महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
* साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार. ('बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी)ड१़
* शाहू मोडक पुरस्कर (२०१८)
* संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)

Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर ह्यांची पुस्तके